Bihar election result 2020..बाळासाहेब आंबेडकर , चंद्रशेखर आजाद उर्फ रावण आणि पप्पू यादव यांचे बिहार मध्ये काय झाले ?
हम तो डुबेंगे ही सनम
तुमको भी ले डुबेंगे...!
मनुवाद्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी चार वेळा लोकसभेवर निवडून आलेले जन अधिकार पार्टीचे सुप्रिमो राजेश रंजन उर्फ पप्पू यादव मैदानात उतरले आणि त्यांना साथ देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, आझाद समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष धाऊन गेले. हे सर्व एकत्र आले आणि बिहार जिंकण्यासाठी त्यांनी प्रगतीशील लोकतांत्रिक गठबंधनचा तात्पुरता तंबू उभारला. पप्पू यादव यांनी 243 जागांपैकी स्वतःकडे 152 जागा ठेऊन BMP 45, SDPI 12, SDPI 4, ASP 9 आणि VBA ला 19 जागा सोडल्या.
दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव या 31 वर्षीय तरुणाने कान्ग्रेसला सोबत घेऊन अख्खा बिहार पिंजून काढला.
अंतिम निकाल समोर आले आहेत तरी चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे या चित्रात पप्पू यादव यांचं गठबंधन कुठेच दिसत नाही.
ह्या पक्षांनी स्वतःची ताकद ओळखून लालटेनला साथ दिली असती तर बिहार आज मनुवाद्यांच्या मगरमिठीतून सुटलेला दिसला असता ! अत्यंत काट्याच्या लढतीत पप्पू यादव यांच्या गटबंधनला मिळालेल्या मतांचं आता काय लोणचं घालणार का ?
बिहारमध्ये विधानसभेचे एकूण 243 जागा आहेत. बहुमताचा आकडा 122 आहे.
एनडीए म्हणजेच भाजप , जद(यू), हम आणि व्हीआयपी यांनी मिळून एकूण 125 जागा जिंकलेल्या आहेत.
तर महागठबंधन म्हणजेच काँग्रेस, राजद ,सीपीआय, सीपीय(एम), सीपीआय (एम एल) यांनी एकूण 110 जागा जिंकलेल्या आहेत.
ओबीसी साहेब यांचे एमआयएम या पार्टीने 5 जागा जिंकलेल्या आहेत तर मायावती यांच्या बीएसपी या पक्षांनी 1 जागा जिंकलेल्या आहेत आणि चिराग पासवान यांच्या पार्टीने 1 जागा जिंकली आहे तर अपक्ष 1 जागा जिंकली आहे .
बिहारचा निकाल हा देशाचे भवितव्य घडवणार आहे.
बघत राहा...
आता तेवढंच गटबंधनच्या हातात उरलं आहे...!
तुला काय करायच आहे भाऊ आम्ही लोणचं घालू किंवा काहीपण.
उत्तर द्याहटवाइतक्या दिवस काँग्रेस तर भर भरून घोटाळे करतच आली आहे.
भाजपा तर दिवसण दिवस मनुवादी होत चालली आहे.
लोकराजा नाव देऊन तुमच्या सारख्या काँग्रेस च्या नवजात बालकाने कांगावा करू नये हरण्याचा.