बांधकाम कामगार सनियंत्रण व सल्लागार शासकीय समिती स्थापन ; आ.राजु खरे अध्यक्ष
रोहित एकमल्ली व अन्य पाच सदस्य व सहाय्यक कामगार आयुक्त सचिव
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा,मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण व सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश दि.२३ मार्च २०२६ रोजी जिल्हा कार्यालयाकडून जारी करण्यात आला. या मध्ये अध्यक्षपदी आ.राजु खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन निर्णय उद्योग,उर्जा,कामगार व खनिकर्म विभागाच्या संदर्भानुसार ही समिती गठित करण्यात आली असून यामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे,कामगारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे तसेच योजनांची अंमलबजावणी सुलभ करणे यासाठी ही समिती कार्य करणार आहे.
समितीमधील सदस्य पुढील प्रमाणे :
अध्यक्ष - आ.राजू खरे,
पुरुष सदस्य प्रतिनिधी- रोहित एकमल्ली, सरफराज सय्यद,
महिला सदस्य प्रतिनिधी-रोहिणी रणदिवे,ललिता जावळे,
मालक प्रतिनिधी-शुभांगी धोत्रे व सदस्य सचिव सहाय्यक कामगार आयुक्त आहेत.
या समितीमुळे कामगारांच्या योजना राबविण्यात वेग येणार आहे.
—————————————
ही आहेत समितीची कामे-
बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविणे व नोंदणीकृत कामगारांना विवीध योजना मिळवून देणे, कामगारांना आरोग्य सहाय्य,अपघात मदत, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन,कामगारांच्या समस्या व अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे व त्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय साधणे,कामगारांमध्ये शासनांच्या योजनांविषयी जनजागृती करणे, कामगारांच्या कल्याण , सुरक्षितता व सामाजिक संरक्षणासाठी उपाययोजना करणे.

0 टिप्पण्या