पुणे सेशन्स कोर्टाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या महीलेला जामिन नाकारताना अत्यंत जबरदस्त उत्तर दिले.
The Pune Sessions Court has denied bail to a woman who used abusive language against Babasaheb Ambedkar.
पुणे - पुणे जिल्ह्यातील फेसबुकी समाजकंटक, बाबासाहेंबाबद्दल आणि संविधाना बद्दल अपशब्द वापरणाऱ्या, सामाजिक तेढ व चिथावणी निर्माण करणारी फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी वंदना भोसले हिच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई लवकर पुर्ण होईल असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही पुणे पोलिसांनी स्पष्ट केले होते.
या संदर्भात गुन्हा दाखल केले नंतर सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांची भेट घेण्यात आली होती. यात प्रामुख्याने सुवर्णाताई डंबाळे, संगिताताई आठवले , शशिकलाताई वाघमारे , आरतीसाठी साठे इत्यादी महीला नेत्या उपस्थित होत्या.
या महीलांनी या संदर्भात जबाब दो आंदोलन करुन वंदना भोसले हीला पोलीसांकडे सपुर्द केले होते.
त्यानंतर कायद्या बद्दल द्वेष निर्माण करणारी वंदना भोसलेला कायदाच सर्वश्रेष्ठ आहे हे कळून चुकले असेल तिला आरोपीला न्यायालयीन कोठडी होऊन येरवडा जेल येथे रवानगी करण्यात आली.
पुणे सेशन्स कोर्टाकडे तिने दोनदा जामिनासाठी अर्ज केला होता पण कोर्टाने दोन वेळेस जामीन अर्ज फेटाळला आहे.
पुणे सेशन्स कोर्टाने बाबासाहेंबाबद्दल अपशब्द वापणार्या महीलेला जामिन नाकारताना अत्यंत जबरदस्त उत्तर दिले.
त्यात कोर्टाने असे नमूद केले आहे की,
1 ) बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे स्कोलर म्हणून ओळखले जातात.
2 ) त्यांनी केवळ राष्ट्रासाठीच नव्हे तर मानवतेसाठीही काम केले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
3 ) त्यांच्यासाठी किंवा इतर कोणत्याही सन्माननीय व्यक्तिमत्त्वासाठी कोणतेही शब्द वापरताना प्रत्येकाने विशिष्ट संयम राखला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा