पहा बिहार मध्ये कुणाची सत्ता येईल ? सर्व एक्झिट पोल ..... - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

पहा बिहार मध्ये कुणाची सत्ता येईल ? सर्व एक्झिट पोल .....

 पहा बिहार मध्ये कुणाची सत्ता येईल ? सर्व एक्झिट पोल...

 

          कालच अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे . ज्याप्रकारे अमेरिकेत सत्तांतर झालेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात सत्तेत उलटापालट झालेली आहे त्याच प्रकारे भारतामध्ये होईल का ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

         त्यातच बिहार मधील निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला आता फक्त निकालाची वाट पाहत आहोत. 

        उद्या दहा तारखेला बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


         बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे

        आपल्याकडे एक्झिट पोल म्हणजेच निकाल काय लागेल ? कुणाला किती सीटा मिळतील ? याचा अंदाज बांधला जातो.



         तो आज जेवढ्या जेवढ्या कंपन्यांनी किंवा या एक्झिट पोल घेणाऱ्या संघ संघटना आहेत त्या सर्वांच्या आपण तुम्हाला एक्झिट पोल दाखवणार आहोत.

        हे जे काही एक्झिट पोल आहेत ते कधीकधी खरे ठरतात तर कधी कधी पूर्णपणे चुकीचे.


          आपण पहिल्यांदा ॲक्सिस या कंपनीचा एक्झिट पाहुयात यांनी एनडीए म्हणजेच भाजप आणि जद( यू )यांना टोटल 80 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महा गटबंधन म्हणजेच राजद आणि काँग्रेस यांना 150 मिळतील असा अंदाज बांधला आहे  तर एल जे पी म्हणजेच लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांची होती ती आता चिराग पासवान चालवत आहेत तरी यांना 4 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे आणि इतर 9 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. 


          आत्ता आपण टुडेज चाणक्य यांचा महा एक्झिट पोल पाहूया यांनी एनडिए म्हणजेच भाजप आणि जर ( यू )यांना 55 जागा मिळतील आणि महा गटबंधन म्हणजेच काँग्रेस आणि राजद यांना 180 जागा मिळतील तर लोकजनशक्ती पार्टी यांना 0 जागा मिळतील तर इतर यांना 8 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे.


        सि-वोटर यांनी जो एक्झिट पोल मांडला आहे तो आपण पाहूया यांनी एनडीए म्हणजेच भाजप आणि जद ( यू ) यांना 116 जागा वर्तवले आहेत तर महागठबंधन म्हणजेच काँग्रेस आणि राजद यांना 120 जागा असा अंदाज बांधला आहे तर एलजेपी ला  1 जागा त्यांनी दिलेली आहे तरी इतर यांना 6 जागा दिले आहेत.


          डीव्ही रिसर्च यांनी जो अंदाज बांधला आहे तो असा आहे एनडीएला म्हणजेच भाजप आणि जद( यू) यांना 110 ते 117 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर महा गटबंधन म्हणजेच काँग्रेस आणि राजद यांना 108 ते 123 जागा मिळतील असा अंदाज आहे तर एलजेपी ला  4 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे तर इतर यांना 8 ते 23 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी बांधला आहे.


            जन की बात यांनी एक्झिट पोल मांडला आहे तो असा आहे यांनी एनडीएला म्हणजेच भाजप आणि जद( यू )ला 91 ते 117 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर महागठबंधन ला म्हणजेच काँग्रेस आणि राजद ला 118 ते 138 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर एलजेपी ला 5 ते 8 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर इतरांना 3 ते 6 यादरम्यान दरम्यान जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. 


          पिपल पल्स यांनी जो एक्झिट पोल मांडला आहे तो असा आहे यांनी एनडीए म्हणजेच भाजप आणि जद ( यू )यांना 90 ते 105 दरम्यान जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर महागठबंधन म्हणजेच काँग्रेस आणि राजदला 103 ते 120 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर एनजेपी ला 3 ते 5 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे तर इतर यांना 5 ते 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.


           शेवटचा एक्झिट पोल सुपर एक्झिट पोल यांनी मांडलेला आहे यांनी एनडीएला म्हणजेच भाजप आणि जद ( यू )ला 88 जागा दिलेले आहेत तर महागठबंधन म्हणजेच काँग्रेस आणि राजद यांची एकूण 141 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला आहे तर एलजेपी ला 4 जागा मिळतील आणि इतर यांना 10 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads