जालना येथील मातंग कुटुंबाने ऐन दिवाळीत हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
जालना - यशोदीप नगर अंबड रोड जालना येथील रहिवासी असणारे नितीन तायडे वत्सला तायडे प्रल्हाद तायडे व जयश्री तायडे या कुटुंबाने 14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता स्वतःच्या घरी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून भंते रैवत यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली
मा. राजरत्न आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश मधील हातरस येथील प्रकरणानंतर गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे 256 कुटुंबीयांना धम्मदीक्षा दिल्याने देशभर आंबेडकरी चळवळीत चेतना निर्माण झाली त्यानेच प्रेरित होऊन जालना येथील भारतीय बौद्ध महासभेचे प्रेमानंद मगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तायडे कुटुंबास धम्मदीक्षा घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
धम्मदीक्षा कार्यक्रमात भंतेजी ने त्रिशरण - पंचशील व बावीस प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा कार्यक्रम संपन्न केला.
भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक दिनेशजी हनुमंते सर यांनी धम्मदीक्षा घेतलेल्या कुटुंबास धम्मदीक्षा प्रमाणपत्र देऊन कुटुंबास मार्गदर्शन केले.
धम्मदीक्षा घेतलेल्या कुटुंबाचे राजरत्न आंबेडकर यांनी स्वागत केले :
राजरत्न आंबेडकर हे असे म्हणाले की, "हिंदुओं के सबसे बडे त्योहार दीपावली के अवसर पर हिंदुओं के एक और परिवारने महाराष्ट्र के जालना जिल्हे मे हिंदू धर्म का त्याग कर बौद्ध धम्म अपनाया .
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा के सभी पदाधिकारीयों को मंगल कामना और परिवार का बौद्धधम्म स्वागत" !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा