गायरान धारकांना ताबापट्टा मिळवून देणार - ॲड. प्रकाश आंबेडकर
कुटासा येथे आयोजित प्रचार बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करतांना त्यांनी गायरान संदर्भात भुमिहिन गायरान धारकांची २०११ पूर्वीचे गायरान जमीन किमान २ एकर क्षेत्र ताबापट्टा त्यांच्या नावे करण्याचे धोरण अवलंबून व त्यांना शेती आधारित योजनांचा लाभ मिळावा तसेच घरकुल योजनेत त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी योग्य ते धोरण आखण्यात येईल.
जातीनिर्मुलणांचे कार्यक्रम व जातीय शोषण थांबवण्याची उपाययोजना याबाबत वंचित बहुजन आघाडी अग्रक्रम कार्यक्रम आखेल असे त्यांनी म्हटले आहे.
येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या मतदानात प्रेशर कुकर या चिन्हावरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा