गणेशोत्सवात पुण्यात नवे निर्बंध नाहीत - उपमुख्यमंत्री अजित पवार
There are no new restrictions in Ganeshotsav in Pune - Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे - पुणे येथे आज कोरोना संदर्भात मिटिंग आयोजित करण्यात आली होती . या मिटिंग नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रेस ला सांगितले की, येणारी कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना घातक आहे. पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. पुण्यात दोन जंम्बो कोविड हाॅस्पिटल उभारले आहेत, ते अद्याप काढण्यात आले नाहीत कारण ते उभे करण्यासाठी दोन दोन महिने लागतात. तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियोजन आणि मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
नवीन निर्बंधाविषयी चर्चा झाली. पण नवीन निर्बंध लावणार नाहीत. पुण्यात रात्रीपर्यंत लोकं बाहेरुन येतात. सगळेजण गणेशोत्सवासाठी येत असतात. पण यंदा देखावे नाहीत, त्यामुळं गर्दी होण्याची शक्यता नाही. पण गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा अंदाज घेऊन गरज पडली तर दुसऱ्याच दिवशी कठोर भूमिका घेऊ शकतो, अशा प्रकारची वेळ कृपा करुन येऊ देऊ नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा