राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आणि एसटी महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटणार - लोकराजा

Breaking News

Adsense ad

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आणि एसटी महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटणार

राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आणि एसटी महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटणार 

The salaries of thousands of ST employees in the state and the financial problems of the ST Corporation will be solved

मुंबई - महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळ कोरोना आल्यापासून तोट्यात गेले होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चालक , वाहक आणि इतर कर्मचार्यांचा वेतन करताना अडचणी येत होत्या.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालातील अनेक कर्मचारी पगारापासून खुप दिवस वंचित होते.


उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निर्देशांनंतर एसटी महामंडळाला तातडीने ५०० कोटींचे वितरण करण्यात आले आहे .

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी रुपये ५०० कोटींचा निधी वितरीत करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिले आहेत. अर्थमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने निधी वितरीत करण्यात आला असून राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आणि एसटी महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. 


कोरोना काळात लागलेले निर्बंध, प्रवाशांची रोडावलेली संख्या, इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे गेल्या काही काळापासून एसटी महामंडळाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडे मदत मागितली होती. त्यावर लगेचच निर्णय घेत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी ५०० कोटी वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. 


त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads