यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झाले कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत झाली घोषणा
... आमदार प्रणिती शिंदे यांच्या यशस्वी लढ्यास अखेर यश !
मुंबई : आज दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी मा. कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योग हा प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. सोलापूर शहरात 85 हजार यंत्रमाग कामगार असून त्यांच्या भविष्याकरीता व कल्याणाकरीता यंत्रमाग कल्याणकारी मंडळ स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण जाहिर करण्यात आलेले असून त्यामध्ये दि. 02 फेब्रुवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकूल योजना कामगार कल्याण योजना, आरोग्य विमा योजना इत्यादी संबंधित विभागाच्या सहाय्याने राबविण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला होता. सदर योजना राबविण्याकरीता आराखडा तयार करण्यासाठी दि. 15 ऑक्टोंबर, 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात झाली असून या योजनेचा आराखडा समितीकडून तयार करण्यात आला असून तो शासनास सादर केला आहे. यंत्रमाग उद्योगातील कामगार हा मुख्य घटक आहे.
देशातील खालोखाल सर्वात जास्त रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग असून देशात एकूण चालू असलेल्या यंत्रमाग उद्योग पैकी 50 टक्के पेक्षा जास्त यंत्रमाग हे महाराष्ट्र राज्यात असून भिवंडी, मालेगांव, इचलकरंजी, सोलापूर, विटा, सांगली या ठिकाणी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या 25 ते 30 लाखाच्या आसपास असून त्यामध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे. यामध्ये लुम कामगार, डब्लींग कामगार, रंगारी, वायडींग, वारपर, शिलाई कामगार, टॉवेल चेकिंग, पॅकिंग, कटींग व सफाई कामगार, घडी खाता, गाठ बांधणारे, मुनीम, जॉबर, लेसींग, कांडीमशीन इ. सर्व कामगारांचा समावेश आहे. बांधकाम कामगारांच्या मंडळाच्याधर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. या यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या हिताकरीता स्वतंत्र कायदा निर्माण करणे, त्यांना भविष्यनिधीचा लाभ, ईएसआयचा लाभ, किमान वेतन कायद्याची पुनर्रचना, निवृत्ती वेतन, कौशल्य वाढविण्याच्या दृष्टिने प्रशिक्षण, मालेगांव येथील यंत्रमाग कामगारांप्रमाणे घरकूल योजना राबविणे ही योजना कामगारांच्या हिताकरीता राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे यावर चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात मा. कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्याची घोषणा केली. यावेळी संबंधित अधिकारी व शिष्ट मंडळ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा