नाकाबंदी करायला काय तालिबानी येणार आहेत का? अशा दुतोंडी राष्ट्रवादीचा धिक्कार असो - भाजप आमदार गोपीचंद पडळकर.
Farmers will come for the race, the Taliban will not come from Afghanistan - BJP MLA Gopichand Padalkar
सांगली - सांगली जिल्ह्यातील झरे येथे 20 ऑगस्ट 2021 रोजी गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी झरे या ठिकाणी जाणाऱ्या बैलगाडी मालकांना आणि शेतकऱ्यांना अडवण्यासाठी प्रशासनाने आपली पूर्ण ताकद लावली आहे . शर्यत अडवण्यासाठी गृह खात्याने कंबर कसली असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांना असे संबोधित केले आहे की , " भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचा छळ कपटान नामोनिशाण मिटवायला हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत.
मागील दोन वर्षांपासून ना तारीख घेता आली ना अध्यादेश घेता आला, जेव्हा मी स्पर्धेचे आयोजन केलं तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समोर बैठका घेऊन असे भासवले की आमचा छकडा शर्यत तिला विरोध नाही परंतु हे राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा छकडा शर्यतीच्या स्थानावरती नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहेत.
17 ऑगस्ट पासूनच सगळीकडे नाकाबंदी करण्याचा अध्यादेश यांनी काढलेले आहेत. अरे बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत अफगाणिस्थान वरून तालिबान तरी येणार नाहीत, इतके तुम्ही बंदोबस्त लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहात.
मुळात यामध्ये आम्हाला कुठलेही राजकारण करायचे किंवा आणायचे नाही .बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. म्हणून तुमची दुटप्पी ,दुतोंडी भूमिका आहे ती आता शेतकऱ्यांच्या समोर उघडी पडली आहे. याच बैलगाडा शर्यतीला जर पाठबळ असेल तर तुम्ही सगळेजण या शर्यतीला मदत करा. शेतकऱ्यांना माझे आवाहन आहे की ,त्यांनी ताकदीने या विषयांमध्ये उतरा जर आपण ताकतीने उतरलो तर आणि तरच आपला बैल वाचेल, गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडा शर्यती चालू होतील. "
असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा