महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कर्नाटक हद्दीतील कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधकाम करणेसाठी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी बेळगांव जिल्हाधिकारी यांची भेट घेतली - राजू शेट्टी
कोल्हापूर -सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कर्नाटक हद्दीतील कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधकाम करणेसाठी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी बेळगांव जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
यावर्षी कोल्हापूर ,सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर , सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.
कृष्णा , दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नदयावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदया पाञापासून दोन - दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते.मी बेळगांव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्यांनी पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थीती निदर्शनास आणून देऊन बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा , दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.
सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल , हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा -वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असलेने आपण कर्नाटक राज्य सरकारशी पाठपुरावा करून कर्नाटक सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करणेस जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तातडीने योग्य ती कार्यवाही व्हावी हि विनंती केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा