शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला - छगन भुजबळ
There is no such thing as Chhagan Bhujbal against Shiv Sena. Late Shiv Sena chief. Dispute settled while Balasaheb Thackeray was alive - Chhagan Bhujbal
छगन भुजबळ यांनी प्रेस मध्ये अस सांगितले आहे की,
" शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहीला नाही. तो राग इतरांनी का मनात ठेवावा. इतरांनी देखील आपल्या मनात राग ठेऊ नये. माझी कुणाविरूद्धही तक्रार नसून माझ्या कडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो आहे, आमचे मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्री असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.
जिल्हा नियोजन निधीवरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी तथ्यहीन आरोप केल्यानंतर आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वादाला पूर्ण विराम लागावा अशी माझी इच्छा आहे. सरकारच्या सर्वोच्च स्थानी मुख्यमंत्री आहेत. ते याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या अडचणी असतील तर त्यांना चर्चा करण्याचा पूर्णपणे अधिकारी असून त्यांच्याशी मी समोरा समोर चर्चा करण्यात तयार आहे. उगाचच माध्यमांसमोर जाऊन आपली भूमिका मांडू नये. चर्चा करून प्रश्न सुटू शकतो.
कोरोनाचा कठीण कालवधीतून आपण जात आहोत. तसेच यंदा जिल्हा नियोजनचा केवळ यंदा फक्त १० टक्के निधी मिळाला आणि ते देखील कोरोनावर खर्च करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार निधीची नियोजन करण्यात आलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, अजुन ६ महिने बाकी आहेत वर्ष संपण्यासाठी उर्वरीत निधी आला की ज्यांची ज्यांची अडचण असेल त्यांची अडचण दुर केली जाईल. त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. निधी वाटपाचे अधिकार माझे नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व संबंधित यंत्रणा आहे. सर्व तालूक्यांवर समान लक्ष ठेवणे हे माझे काम आहे. लोकप्रतिनीधींची अडचण दुर करणे माझे काम आहे.जिल्हा नियोजन निधीचा वाद कोर्टापर्यंत जाणे योग्य नाही.
एकीकडे कोरोना त्यात अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थिती यामध्ये झालेले नुकसान यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर असून ते सोडविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा असून या वादाला मी पूर्णविराम देत आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा