संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली - आमदार प्रणिती शिंदे - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली - आमदार प्रणिती शिंदे

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली

 

- आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे मागणी


सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर जमा करण्याची मागणी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.  


यामध्ये सोलापूर शहरामध्ये संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात गोर-गरीब असून त्यांची जबाबदारी सांभाळणारे त्यांच्या कुटुंबात कोणीही नाही व त्यांना उदरनिर्वाहाकरीता अडचणी येत असतात अश्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना दिवाळीच्या पूर्वी अनुदानाची रक्कम मिळाल्यास गोर-गरीब व निराधार लाभार्थ्यांची दिवाळी गोड होईल, जेणेकरून दिवाळी सणाच्या पूर्वी अनुदान मिळाल्यास लाभार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत होईल. दिवाळी सणाच्या निमित्त पुढील काही दिवसांकरीता बँकांना सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे यामुळे तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणे आवश्यक आहे. याकरीता संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर जमा करण्याची मागणी मा. जिल्हाधिकारी व RDC यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.


यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या पुर्वी लाभार्थ्यांचा बँक खात्यावर अनुदान जमा करण्याचे संबंधितांना आदेश दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads