विधानसभा अधिवेशन पायऱ्यांवर दलितांसाठी आंदोलन का नाही ? - दीपक केदार
विधानसभा अधिवेशन पायऱ्यांवर अनेक वर्षांपासून आम्ही आंदोलन बघतोय, आजही एक आंदोलन झालं. आजपर्यंत या पायऱ्यांवर एकही आंदोलन दलित हत्याकांड थांबलेच पाहिजे, दलित अत्याचार थांबलेच पाहिजेत म्हणत कुणीही केले नाही. हे सगळे दिसणारे निवडणुकीत गळ्यात निळा रुमाल, गाडीला निळा झेंडा घालून मत मागत फिरत होते, आंबेडकरी पक्ष संघटनांचा पाठींबा घेत होते.
वाशीम विश्वास कांबळे, कल्याण दिपक भिंगरदिवे, भोकरदन रत्नदीप भांबळे या महिनाभरात सर्वात मोठे तीन दलित हत्याकांड झाले आहेत यांच्या न्यायासाठी या पायऱ्यावर घोषणा नाहीत. सत्ताधारी असो की विरोधक आमचा मुद्दाच आजवर यांना मुद्दा वाटला नाही.
यावर तरुणांनी गांभीर्याने भूमिका घ्यावी या संधीसाधू जातीयवादी लोकप्रतिनिधी पासून सावध राहावं. आपलं अस्तित्व निर्माण करावं. गुलामीच्या मार्गाने जाऊ नका, गुलामीचा मार्ग नवनिर्मितीचा नाही तर अधोगतीचा आहे. जिथे संवेदना नाहीत तिथे आपण थांबू नये.
सगळ्यांना कोलायला शिका आणि आपलं निर्माण करण्याचा प्रयत्न करा तरच येते आपला आवाज होईल. समाजाचा प्रश्न पटलावर येईल असे दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा