मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबईत आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबईत आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का 

Many Shiv Sena and Congress office bearers have joined BJP ahead of Mumbai Municipal Corporation elections 

Mumbai MLA Nitesh Rane pushes Shiv Sena

मुंबई - मुंबईतील शिवसेना, काँग्रेस, भारिप पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. 

दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशावेळी आमदार सुनील राणे, संजय उपाध्याय, माजी आमदार तृप्ती सावंत, राजेश शिरवडकर, शिवा शेट्टी उपस्थित होते.


आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे, त्या अगोदर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी तसेच इतर पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, हा एकप्रकारे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेला दिलेला धक्का मानला जात आहे.


भाजप मध्ये आज प्रवेश केलेले पदाधिकारी :-

श्री विजू चित्रे अध्यक्ष - महाराष्ट्र वाहतूक सेना (शिवसेना)

सह चिटणीस - भारतीय कामगार सेना


श्री अक्षय विजय चित्रे

उपाध्यक्ष - महाराष्ट्र माल वाहतूक सेना (शिवसेना)

सरचिटणीस - जय भवानी माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन


श्री प्रकाश खंडागळे

माजी जिल्हाध्यक्ष भारिप, जोगेश्वरी पूर्व


श्री गणेश पेडणेकर

काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष, चेंबूर सुभाष नगर


श्री पंकज म्हेतर

सहसंघटक - शिवसेना शिवडी विधानसभा

प्रदेश सदस्य - कुंभार समाज सामाजिक संस्था


श्री सुभाष चिपळूणकर

उपशाखा प्रमुख - १९९, शिवडी विधानसभा


श्री प्रशांत बाबू सुकाळे ( भांडुप)


श्री लोकेंद्र भोमसिंग राठोड ( मालाड)


श्री दिलीप तोडणकर ( शिवसैनिक)


या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये आज प्रवेश केला. आज झालेल्या पक्षाप्रवेशात महिला आणि तरुणांचा मोठ्याप्रमाणावर समावेश होता.


दरम्यान, याप्रवेश सोहळ्यानंतर आमदार नितेश राणे यांनी बोलताना, मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा भगवा फडकविण्याच्या निर्धार व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads