आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने रमाई आवास योजना माहिती शिबीर व नवीन लाभार्थी नोंदणी शिबीरास उत्तम प्रतिसाद
Great response to Ramai Awas Yojana Information Camp and New Beneficiary Registration Camp on behalf of MLA Pranititai Shinde
सोलापूर : अनुसुचित जाती जमाती समितीचे अध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १६, जगजीवनराम वस्ती मधील वाबण्णा वाचनालय येथे रमाई आवास योजना माहिती शिबिर व नवीन लाभार्थी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले कि, ही रमाई आवास योजना शासनाची योजना असून आत्तापर्यंत योजना तळागाळातील लोकांपर्यंत कधीही पोचलेली नाही, त्यासाठी ही रमाई आवास सर्व नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक भागात असे शिबीर आयोजन करून तळागाळातील सामान्य लोकांना लाभ करून देणार आहे.
या नोंदणी शिबीरास श्री. कारंजे, श्री. जगदानी वाघमारे, श्री. गणेश कोळी व त्यांचे सहकारी उपस्थित राहून नवीन नोंदणी करून घेतली. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेविका आशाताई म्हेत्रे, प्रदेश महिला सचिव सुमन जाधव, B ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, मोची समाजाचे उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर, मोची समाज युवक अध्यक्ष यल्लाप्पा तुपदोळकर, रथोत्सव अध्यक्ष राजू निलगंटी, माजी युवक अध्यक्ष कुरमय्या बोंतालेलु, एकता ग्रुपचे माजी अध्यक्ष वेदमूर्ती म्हेत्रे, उमेश निलगंटी, सतीश महाराज म्हेत्रे, विठ्ठल ढाले, शिवा गुदपे, सुनील आयवळे, मारुती जगले, महेश सुपते, राम म्हेत्रे, नरसिंग म्हेत्रे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा