सोलापुरतील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी करणार प्रयत्न..शहरातील सर्व पेट्रोल पंप 24 तास चालू - पालकमंत्री - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

सोलापुरतील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी करणार प्रयत्न..शहरातील सर्व पेट्रोल पंप 24 तास चालू - पालकमंत्री

सोलापुरतील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी करणार प्रयत्न..शहरातील सर्व पेट्रोल पंप 24 तास चालू  - पालकमंत्री

Will try to relax the corona restrictions in Solapur. All petrol pumps in the city are open 24 hours a day - Guardian Minister Dattatray Bharane

शहरातील सर्व पेट्रोल पंप 24 तास चालू करण्याचे पालकमंत्र्याचे आदेश


सोलापूर :- महाराष्ट्रासह सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले होते परंतु मागील काही दिवसात रुग्ण संख्येच्या आधारावर काही शहरांसाठी या निर्बंधांमुळे शिथिलता  देण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील निर्बंध कमी करण्याबाबत गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी विजय बमगोंडे यांनी पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे मागील दोन वर्षापासून कोरोनाचा  प्रादूर्भाव असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात  निर्बंध लादण्यात आले परंतु सर्व व्यापारी व उद्योजकांना बँकेचे हप्ते कामगार पगार हा बंद काळात देखील भरावा लागत आहे. बंद काळातील व्यापार बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या उद्योजकांना कर्जाचा डोंगर वाढत असून कामगारांना देखील उपासमारीची व आत्महत्येची वेळ आलेली आहे.


                      दरम्यानच्या काळात काही भागातील रुग्ण संख्येनुसार काही शहर व जिल्ह्याचे निर्बंध कमी करण्यात आले आहे व त्या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00वाजेपर्यंत व शनिवार दुपारी 3:00 वाजेपर्यंत व्यापार-उद्योग खुले करण्यात आलेले आहेत तसेच ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप व शहर पोलीस पेट्रोल पंप प्रमाणे सोलापूर शहरातील सर्व पेट्रोल पंपाचे देखील निर्बंध शिथील करण्यात यावे या संदर्भाचे निवेदन गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री यांना दिले होते. या अनुषंगाने आज पालकमंत्री यांच्या समवेत बैठक संपन्न झाली या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल करण्याचे व तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंप चालू करण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी प्रमोद दरगड इंद्रमल जैन, जयचंद वेद, हर्षल कोठारी, अनिल जैन, धर्मेश राडिया, अनिल वेद, अशोक चव्हाण, केतन व्होरा, मनिष पंचारीया राष्ट्रवादी शहरअध्यक्ष संतोष पवार व सदस्य गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads