सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू चा दलित महिलांवर होणारे अत्याचार यावर भाष्य करणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज....
Sairat Fame Aarchee i.e. Rinku Rajguru's trailer release on the atrocities against Dalit women on zee5 ....
भारत देशात सध्या दलित , मागासवर्गीय ,आदिवासी आणि अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार वाढले आहेत . देशात सध्या जातीवरून लोकांना टारगेट केले जात आहे.
एक ताज उदाहरण म्हणजे Tokyo Olympics मध्ये उत्कृष्ट खेळ करणारी भारतीय महिला हॉकी संघाची स्टार प्लेयर वंदना कटारिया यांच्या घराबाहेर जातीवरून शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या परिवाराला जातीवरून शिवीगाळ करून धमकावण्यात आले.
दुसरे उदाहरण म्हणजे दिल्ली येथे एका चौदा वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला.
या सर्वांचा विचार करता हा चित्रपट खूप चर्चिला जात आहे. या चित्रपटाचे नाव 200 Halla Ho आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर zee5 वर रिलीज झाला आहे.
200 Halla Ho हा चित्रपट हिंदी आहे .
यामध्ये सैराट मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूने उत्तम भूमिका पार पडली आहे. या चित्रपटांमध्ये खूप दिग्गज अभिनेत्यांनी काम केले आहे त्यामध्ये अमोल पालेकर, वरूण सोबती, रिंकू राजगुरु तसेच मराठी अभिनेता उपेंद्र लिमये देखील यात पोलिसांची भूमिका पार पाडताना दिसत आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता आहेत.
दिग्दर्शक आणि लेखक सार्थक दासगुप्ता म्हणाले की , "हा चित्रपट त्या दलित महिलांविषयी आहे ज्यांना अत्याचाराला क्रुरपणे सामोरे जावे लागले . समाजात छेडछाड , त्रास आणि अपमान सहन करावा लागला. त्या संबंधित व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी यांना कायदा आपल्या हातात घ्यावा लागला.
मला अपेक्षा आहे की हा चित्रपट त्याच्या विरोधात नक्की आवाज उठवेल, समाजात बदलाची गरज आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा