दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये सुविधा केंद्र उपलब्ध
After SSC (10th ) Diploma Engineering Admission Process Re-extended Facility center available at Sveri Polytechnic at Pandharpur.
पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि. ३० जून २०२१) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि ३० जुलै ला संपणार होती पण दरम्यानच्या कालावधीत अनेक विद्यार्थांना कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत ही बाब लक्षात आल्यामुळे आता या प्रक्रियेस मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना दि.०६ ऑगस्ट २०२१ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या वर्षी प्रथमच दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती. आता विद्यार्थांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त त्यांचा दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
डिप्लोमा इंजिनिअरिंग सन २०२१-२२ करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे हे १४ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची परंपरा या महाविद्यालयाने कायम राखली आहे. ही प्रकिया वाढलेल्या मुदतीनुसार दि.३० जून २०२१ पासून ते दि. ६ ऑगस्ट २०२१ सायं ५ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ०९ऑगस्ट २०२१ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या दि. १० ऑगस्ट २०२१ ते १२ ऑगस्ट २०२१ या दरम्यान सादर करता येतील. अंतिम गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट २०२१ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनीरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र. प्रा .एस. एस. गायकवाड(मोबा.-९८९०५६६२८१) व प्रा.एम .एम .मोरे (९४२१९६०२५८) यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली व उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने या महाविद्यालयातील ५ अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन मिळालेले आहे. असे मानांकन मिळवणाऱ्या राज्यातील काही मोजक्याच महाविद्यालयापैकी स्वेरीचे डिप्लोमा कॉलेज हे एक आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील ‘बेस्ट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॅम्पस’ चा बहुमान सुद्धा या महाविद्यालयाला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. या वर्षीही विद्यार्थी व पालक यांचेकडून स्वेरी डिप्लोमालाच प्रथम पसंती व उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२१-२२ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
धन्यवाद सर 🙏
उत्तर द्याहटवा