अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने भांडणारा नेता गणपतराव देशमुख :- सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री
सोलापूर - गणपतराव देशमुख शेतकरी, लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने बांधणारे नेते होते गरिबांची, शेतकऱ्यांची जाण ठेवणारे ते नेते होते. परवाच त्यांची भेट झाली होती. सुखरूप घरी या अशा शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ते वैभव होते. समाजाचे प्रश्न मोठ्या हिरिरीने ते विधानसभेत मांडायचे. विशेषता दुष्काळी भागातील शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायासाठी ते पोटतिडकीने बांधत असताना मी पाहिले आहे.
मी आमदार होण्याच्या अगोदर १२ वर्षापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत व महाराष्ट्राच्या राजकारणात होते. तेव्हापासून मी त्यांना पाहतो आहे. मी 1974 मध्ये आमदार झालो तेव्हापासून मी त्यांना अतिशय जवळून पहात आलो आहे 11 वेळेस आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी प्रगती प्रतिनिधित्व केले आहे. मी एका विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगोल्याला गेलो होतो. आणि त्यावेळेस माझे भांबुरे नावाचे सहाय्यक निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे होते. त्यावेळेस ते मला म्हणाले होते की हा तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे. तुम्ही माझ्याविरुद्ध पक्षाचा प्रचार करू शकता असे दिलदारपणे म्हणाले होते.
आमच्या पुलोद सरकार मध्ये ते कृषी मंत्री होते. तेव्हा शरद पवार यांनी त्यांनी इस्राईल देशात शेती बघण्यासाठी अभ्यासासाठी पाठवले होते. तेव्हा त्यांनी आपल्या चालकासाठी एक घड्याळ घेतले. आणि मुंबईत आल्यावर त्याला दिले. गरीब माणसाची आठवण ठेवून त्याला आपल्या कुटुंबातील एक समजून घरातल्या सारखीच वागणूक देणारा आमदार विरळाच ! मी काही दिवसापूर्वी सोलापुरात होतो. आठ दिवसांपूर्वी त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ऑपरेशन झाले होते. सुखरूप घरी या अशा शुभेच्छा देऊन आलो होतो. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. असा जनसमुदायाचा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
असे मा. सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा