हिंगोली काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य सह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश...
Hundreds of congress activists including Hingoli Congress Panchayat Samiti members have been admitted to the Vanchit Bahujan Aaghadi.
खामगांव : हिंगोली येथील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन तसेच पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये खामगांव येथील कार्यालयात जाहीर प्रवेश केला. यावेळी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी त्यांना वंचित चा दुपट्टा गळ्यात टाकून व हार घालून सत्कार केला. येणाऱ्या आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणायचा प्रयत्न करावा. सोबतच पक्ष वाढविण्यासाठी सुद्धा यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्या - छोट्या वंचित समूहाना एकत्रित करून शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय द्रुस्ट्या मागासलेपन घालविण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे आणि त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या संघटना काढुन त्यांची ताकद कमी करण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी पक्षासोबत राहावे असेही अशोक सोनोने यांनी सांगितले.
यावेळी हिंगोली येथील पंचायत समितीचे सदस्य दुल्हे खाँ पठाण, शम्मु खाँ पठाण, शे. अजीज शे. महमोद, कळंम कोंडा ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप घुगे, सदस्य अफ़्रोज पठाण, अजगर खाँ पठाण, योगाजी गवळी,, सय्यद नौशाद यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे, माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव, संदीप वानखडे,अमन हेलोडे, विष्णु गवई, वंचितचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सुरेश धोतरे,जिल्हा महासचिव रवींद्र वाढे ,माजी जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख,जिल्हा प्रवक्ता ज्योतीपाल रणवीर,रुपेश कदम ,जिल्हा संघटक अनिल कांबळे ,जिल्हा नेते विनोद नाईक, माजी शहराध्यक्ष अतीक भाई , युवानेते योगेश नरवाडे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा