कडूबाई खरात आणि अमृता फडणवीस यांच्या गायकीतला फरक आणि आरक्षण.....
कडूबाई खरात या मागील चार-पाच वर्षात प्रसिद्ध झालेल्या गायिका आहेत. त्यांना कुठेही मीडिया भेटलेला नाही त्या सोशल मीडियातून मोठ्या झालेल्या आहेत. लोकांनी त्यांना सोशल मीडिया वरती व्हिडिओ बघून लाईक केलेले आहे.
अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी आहेत
"अमृता , खर मेरीट असलेल्या गायकांना तु जगू दे" अशी म्हणायची वेळ आली आहे कारण त्यांनी तिला जगू द्या हे गीत गायलेल आहे.
या गीताला यु ट्युब वर 6 हजार 300 likes तर 43 हजार dislike मिळालेली आहेत.
अमृता मधे मेरीट नसून देखील तिला T- series गायला संधी देते.
कडू बाईच गाणं स्वतःहून लोकांनी लाईक केल...लाखो लोकांनी शेअर केल होत,न्युज चॕनल्स मुलाखत घ्यायला स्वतः हून आले होते.
कडूबाई खरात यांचा आवाज खूप छान आहे त्यांच्या जबरदस्त आवाजामुळे त्यांना लवकरच लोकप्रियता मिळाली.
कडूबाई खरात यांच्याकडे कुठलेही अत्याधुनिक म्युसीकल साहित्य नाही,ती पञाच्या घरात राहते.जातीच नेटवर्क नाही. नवरा मुख्यमंत्री नव्हता.अस्पृश्य जातीत जन्माला आली.जातीय अपमान सहन करत जगत आली.
अमृता फडणीस यांचा आवाज एवढा छान नाही पण त्यांच्याकडे राजकीय पाॅवर आहे .अमृता कडे अत्याधुनीक म्युसिक साहित्य आहे. आटो ट्युन साॕफ्टवेयर मधून आवाज चांगला करून मिळतो,कित्येक म्युसिक डायरेक्टर मार्गदर्शन करायला सेवेत आहेत.मोठ्या म्युसिक कंपनी अमृताला डोक्यावर घेऊन नाचतात.नवरा मुख्यमंत्री होता.ब्राह्मण घरात जन्माला आली.सगळीकडे पैसा ,जात,सत्ता याच नेटवर्क आहे.
सगळ्या क्रिम क्षेत्रात जातीय नेटवर्क मुळे खऱ्या मेरीटला संधी मिळत नाही,अमृता सारखे डंब लोकांना संधी मिळते म्हणून खर टॕलेन्ट,मेरीट साठी आरक्षण असते.
अमृता आणी कडूबाई हे येथील समाजव्यवस्थेच चित्र आहे
आणी हो... कडूबाई खरात यांच्याकडे कोणती पॉवर नाही .त्या गरीब घरात जन्मलेल्या आहेत. बाबासाहेबांचे गाणे गाऊन त्या त्यांच्या मुलीचा आणि त्यांची उपजीविका भागवतात.
अस्पृश्यांना पूर्वीच्या काळी शिक्षणाला सुद्धा बंदी होती. त्यांचा खूप छळ केला जात होता . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सगळ्यांना समजता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष ही मुल्य दिली. हजारो वर्षे गुलामगिरीत जगणार्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी मोठी समाजाच प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेले आहे.
मात्र अमृता फडणवीस यांना कोणत्याही प्रकारची गुलामी करावी लागली नाही किंवा त्यांना उच्च-नीच या गोष्टींचा फरक पडलेला नाही.
अमृता फडणीस यांना सहज शक्य आहे व्यासपीठ उपलब्ध होण.
आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आज बर्यापैकी समजलं असेल की आरक्षण हे जातीवर आधारित नसून ते एखाद्या वंचित , मागासलेल्या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची दिलेली संधी आहे.
अमृता चा आवाज आताच वाईट आहे म्हणून ओरड का आहे नवरा मुख्यमंत्री असतांना कुणी बोललं नाही म्हणजे हे चुकीचं आहे सत्ता नाही म्हणून असे म्हणू नका
उत्तर द्याहटवाआणि कुणाचा आवाज चांगला आहे हे आपण म्हणूया तारीफ करूया पण कुणी पर्यंत करत आहे त्यांना असे दीचविणे चुकीचं आहे
Like dislike mange करता येतात हे कळतच नाही का
आपल्या महाराष्ट्र ची सून आहे ती असा अनादर करणं चुकीचं आहे