गोंधळून जाऊ नका ... बुद्धाची बाहुली करू नका ! - दिपक केदार
बुद्धाला सजावटीचे साधन आम्ही होऊ देणार नाहीत !
ज्यांना हिंदू धर्म सोडायचा नाही, तेच बुद्धाच्या खांद्यावर चडलेल्या चित्राचे समर्थन करत आहेत. दोन डगरीवर पाय असलेले लाल डोळ्याचे लोक बुद्ध अंगिकारल्याचे नुसत ढोंग करत असतात.
हातोडा "छण्या" मारूनच "लेण्या" बनल्या, बनलेल्या "लेण्या"ला पुन्हा कुणी हातोडा "छ्ण्या" नाही मारल्या. घडवण्याची प्रक्रिया अशीच असते, घडवल्यावर पुन्हा तीच प्रक्रिया केली की विटंबना होत असते.
जगात देश बदलला की "बुद्ध" बदलत जातो, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित "आधुनिक बुद्ध" भारतात बौध्दाने अंगिकारलेला आहे. महामानव निर्मित बुद्धाला आम्हाला शरण जाण्यासाठी डॉ.बाबासाहेब सांगतात... बुद्धम, शरणम्, गच्छामी... तीन वेळा वंदन करूनच!
बुद्धाला शरण जाण्याची प्रक्रिया त्यांच्या खांद्यावर उभा राहणे नव्हे! आस्था, अस्मिता असल्या तर धर्म माणसांच्या उपयुक्त पडतो. चांगल्या धर्मासाठी त्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोण आस्थेतूनच असावा.
जगात ईश्वर-देव नाही हे पहिल्यांदा गौतम बुद्धाने सांगितले हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यात पेरला त्यासाठी त्यांनी बुद्धांच्या मांडी खांद्यावर लेकर बसवले नाहीत. लाखो अनुयायी धम्म दीक्षा घेतात ते ही गुडघ्यावर बसून वंदन करूनच...
जो बौद्ध झाला तो देवाला मानतच नाही, तो विज्ञानवादी झाला आहे, 22 प्रतिज्ञा ज्यात मी गौरी गणपती देवी देवताला माननार नाही ही आमची प्रतिज्ञा आहे. बुद्ध अंगिकारल्यावर आमच्यावर पुन्हा शंका का?
देशात एक वर्ग असा आहे, त्याला हिंदू धर्म सोडायचा नाही पण बुद्ध सुद्धा हवे आहेत. तो समूह असं काही डोकं लावत असतो, तो मुळातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही. तो म्हणतो बुद्ध आधी आणि मग बाबासाहेब आणि आम्ही म्हणतो बाबासाहेब आधी मग बुद्ध कारण बुद्ध आम्हाला बाबासाहेबांमुळे समजले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध घडवलेत ते आधुनिक आहेत, उघड्या डोळ्यांचे आहेत. त्यानंतर कुणीही बुद्ध घडवण्याचा प्रयत्न करू नये.
तुम्हाला जर झाडी कुंड्या, झोपायचे बिस्तर, उश्या, मसाज सेक्स पार्लर, सजावटीसाठीचे साधन म्हणून बुद्ध हवे असतील आणि त्यासाठी तुम्ही म्हणणार असाल की बुद्धांनीच सांगितलय देव नाही तर हे निंदनीय आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने बुद्ध समजून घ्या, बुद्ध समजून सांगण्याची नवी प्रक्रिया म्हणजे त्यांच्या खांद्यावर चडणे असेल तर हे कुणालाही पचणार नाही. पा रंजीत सारख्या दिग्दर्शकाने असे काही करणे टाळले पाहिजे होते.
एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने हा शीन टाळयला हवा. लाल डोळ्यांचा दृष्टिकोन दोन डगरीवर पाय ठेवणारा आहे. त्यातूनच हे घडलं आहे. आम्ही खूप समजदार आहोत, बुधिस्ट आहोत म्हणूनच शांत आहोत. याचा अर्थ तुम्ही विकृती पेरणार हे चालणार नाही.
धर्मांतराची भीती असलेल्या असुरक्षित लोकांनी हे खेळ करू नयेत. आधुनिक सारनाथ दीक्षाभूमी येते महामानवाने धर्मांतर करून बौध्द धम्म अंगिकारला आणि हिंदू धर्म सोडला. त्यांनी तत्वज्ञानाच्या नुसत्या गप्पा मारल्या नाहीत.
रुपया एवढी गोल टिकली लाऊन, बगलात लांबडी पिशवी घालून, बाहेर बुद्धाच्या अन् घरात हिंदूंच्या गप्पा मारून नवनिर्मिती होत नसते. त्यासाठी धर्मांत्तराचीच गरज असते.
मी पोस्ट बघतोय जे धर्मांतरीत नाहीत, तेच या चित्रांचा जास्त प्रचार करून समर्थन करत आहेत.
आम्ही या चित्राला नाकारतो म्हणून देव मानतो असा त्याचा अर्थ होत नाही.
असं जर पेरत गेलो तर ते हाताबाहेर जाईल आणि भाऊ बहिणीला, बाप मुलीला, आई लेकाला सगळ उद्धवस्त होईल, कुत्र्या मांजरासारखी अवस्था होईल येते काहीच राहायचे नाही, आपला आयडॉल कुत्रा व्हायला वेळ लागणार नाही.
मग हे ही म्हणाल मानव च जात आहे, आई, बहीण, भाऊ काही नाही. असे सुद्धा म्हणायला तुम्ही वेळ लावणार नाहीत.
पण माणसाने धर्माला धरून स्वतः साठी काही आचारसंहिता बनवली आहे, ती खूप महत्वाची आहे.
त्यामुळे ज्या पद्धतीने समीक्षा सुरू आहे. ती चुकीची आहे, सगळीच समीक्षा हातात घेतली तर मग सगळ्यांनाच महागात पडेल....
घरात बुद्धांची मूर्ती अचानक खाली पडतेच की, लहान लेकरांकडून पाय लागतोच की म्हणून बुद्ध कोपेल मग धम्मगुरुला बोलवून काही विधी केलाय... असल कधी घडलं नाही हो, कारण आम्ही बुद्धाला देव मानलं नाही. पण जाणिवपूर्वक त्या मूर्तीला फेकायच, त्यांच्या खांद्यावर बसायचं त्याचं चित्रण करून प्रसारित करायचं हे पण केलं नाही...
बाप मेल्यावर हातानेच त्यांचा अंत्यविधी केला जातो की पायाने केला जातो? त्यांच्या अंगावर बसून केला जातो? आडमुठे पणा हा बदल असू शकत नाही.
याद राखा कुणी जर या चित्राला विरोध केला म्हणून बौद्धांना अंधश्रद्धाळू, देव मानणारे म्हणून हिणवत असाल तर हे आम्ही खपवून घेणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा