देशाचा अमृत महोत्सव कोणासाठी आहे साहेब ? - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

देशाचा अमृत महोत्सव कोणासाठी आहे साहेब ?

देशाचा अमृत महोत्सव कोणासाठी आहे साहेब ?


बाबासाहेब आंबेडकर गांधींना म्हणाले होते की आहे , आय हॅव नो मदरलँड  ( I have No Motherland ) याची आज सुद्धा प्रचिती येत आहे.

आजही दलित आहे म्हणुन सवर्णाच्या  माठातल पाणी पिलं म्हणुन लहान बालकाला शिक्षकाकडून ठार मारल जात आहे .

याची मीडियात साधी चर्चा नाही, निषेध नाही.

आजही माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार नसेल तर हा अमृत महोत्सव कोणासाठी ? 

कसलं स्वतंत्र ? 

आज दलित माठातल पाणी पिऊ शकत नाही , घोडयावर बसु शकत नाही, मिशा वाढवू शकत नाही, हा कोणता अमृत महोत्सव ?

झाडे, डोंगर, दऱ्या, नद्या , सडक उंच इमारती म्हणजे देश आहे का ? तुमच्या संकल्पनेतल्या देशात माणसाची काय भुमिका आहे माणसा पासुन देश नाही आहे का ? 

हा कोणत्या आझादी चा अमृत मोहत्सव ह्या लहानग्या च्या घरच्यांनी साजरा करायचा ?


राजस्थान येथील दलित मुलगा इंद्रजित मेगवाल, वय वर्ष 9 , इयत्ता तिसरीत शिकत होता . तहान लागली म्हणून त्यांने शाळेतील माठातील पाणी पिले तो माठ तेथील शाळातल्या सवर्ण मुख्याध्यापकाचा होता . त्यामुळे त्या मुख्याध्यापकाने इंद्रजीत ला इतके मारले की त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे.


आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत.

भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत . मला माझ्या देशावर प्रेम आहे ही प्रतिज्ञा शाळेत रोज म्हणणाऱ्या मुलानी मठातल पाणी घेतलं म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याचा खुण केला, पाण्याला सुद्धा जातीत पाहिलं पाणी पाणी करून लहान मुलाला ठेसून ठेसून मारलं दलित असणं हा त्याचा गुन्हा होता का ? 

आता शिक्षकाकडून कोणता आदर्श घ्यायचा कोणता समाज निर्माण करायचा. अशा मनुस्मृतीला खतपाणी घालणारा समाज निर्माण करायचा असेल तर महापुरुषांच्या बलिदानावर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाला अर्थ काय राहतो ?

आज घडलेला प्रकार हा त्याच्या घरच्यासाठी काळा दिवस म्हणुन कायम स्मरणात राहील त्यांनी कोणत्या आझादीचा अमृत महोत्सव आठवायचा

कोणता देश आठवायचा, कोणाचा देश आठवायचा ? 

क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी देशाला स्वतंत्र मिळवुन देण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आज त्यांच्या रक्ताला किंमत नाही बलिदानाला अर्थ नाही 


शेवटी एक प्रश्न कायम राहील ह्या मुलाच्या घरच्यांनी आज कोणत्या देशाच्या आझादीचा अमृत महोत्सव साजरा करायचा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads