आता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाकडुन शैक्षणिक फी आकारल्यावर होणार कारवाई - लोकराजा

Breaking News

Adsense ad

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाकडुन शैक्षणिक फी आकारल्यावर होणार कारवाई

आता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाकडुन शैक्षणिक फी आकारल्यावर होणार कारवाई

एन.डी.एम.जे संघटनेचे युवानेते रोहित एकमल्ली यांच्या खडतर पाठपुराव्याला यश


सोलापूर - सध्या दहावी व बारावीचे निकाल लागल्याने प्रवेशाकरिता विद्यार्थी व पालक यांची महाविद्यालयात प्रवेशासाठी रेलचेल सुरू आहे.

 अशा परिस्थितीत मागासवर्गीय  विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रवेशाच्या नावाने आर्थिक लुट करत आहेत.अशाप्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी युवानेते रोहित एकमल्लि यांच्याकडे करीत होते.महाविद्यालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे मागासवर्गीय,गरीब विद्यार्थ्यी  प्रवेशापासून आणि शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके,वैभवजी गिते जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.डी.एम.जे संघटनेचे नेते मा.रोहित एकमल्ली यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  अधिकारी सोलापूर यांना भेटून निवेदन देऊन तिव्र अंदोलनाचा इशारा दिला होता.

या पत्राची दखल घेउन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी तात्काळ पत्र काढुन सर्व महाविद्यालयांना सुचना दिल्या आहेत. 

म्हणून सर्व महाविद्यालयांना आता मोठी चपराक बसली आहे,

आता जर प्रवेशाच्या वेळी कोणत्याही महाविद्यालयाने अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना प्रवेश फी मागीतली तर त्यांच्या वर कडक कारवाई होणार आहे.

अश्याप्रकारे पत्र काढल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक लुटीतून सुटका होणार आहे त्यामुळे अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यी हे नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे व सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मा.कैलास आढे साहेबांचे आभार मानत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads