अग्निपथ योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे:- आ. प्रणिती शिंदे - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, २५ जून, २०२२

अग्निपथ योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे:- आ. प्रणिती शिंदे

अग्निपथ योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे:- आ. प्रणिती शिंदे


सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अग्निपथ योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन


सोलापूर - भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन जवळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले.


यावेळी उपस्थित आंदोलकांच्या हाती लष्कराचे कंत्राटीकरण करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, देशाची संरक्षण व्यवस्था धोक्यात आणणारी अग्निपथ योजना रद्द करा, पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करा, अश्या घोषणांचे फलक होते.


या धरणे आंदोलन वेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, अग्नीपथ योजनेस आमचा विरोध आहे. अतिशय घृणास्पद योजना मोदी सरकारने आणला त्याच्याविरोधात देशभरातील युवक पेटून उठले आहेत लाखो युवक सैन्य भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करत असतात सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न युवकांचे असते. अनेक वर्ष त्यासाठी घालवतो आणि मोदी सरकार फक्त चार वर्षात आर्मी मध्ये ठेवून त्यांना इतर नोकरीचे गाजर दाखवुन वाऱ्यावर सोडणार आहेत. आधी सैन्यात काम केलेल्या लोकांना नोकरीत इतर ठिकाणी कामावर घेतले जायचे ग्रॅज्युएटी, इन्शुरन्स, प्रॉव्हिडंड फंड, पेन्शन असे अनेक योजनेतून सैनिकांना मदत व्हायचे आयुष्यातील महत्त्वाचे चार वर्षे देशासाठी घालवल्यानंतर मोदी सरकार कुठलीही मदत न देता फक्त काही रक्कम हातात देऊन त्यांना खाजगी नोकरीचे गाजर दाखवत आहेत. हे बरोजगार युवकांची क्रूर थट्टा आहे. या अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक युवकांनी आत्महत्या केली तरीही निगरगट्ट मोदी सरकार युवकांचे प्राण गेले तरी ही योजना मागे घेण्याचे दिसत नाही हे अतिशय निंदनीय आहे ही शोकांतिका आहे अजून किती युवकांचे प्राण घेणार, एक तर मोदी सरकारच्या आठ वर्षात एक सुद्धा जॉब निर्माण केला नाही जॉब लॉस झाला. केवळ एक दोन लोक या देशात मोठे झाले आहेत अदानी अंबानी यांची संपत्ती एका दिवसात दहा पट होते पण युवकांच्या अकाउंट मध्ये पन्नास रुपये डिपॉझिट झाले नाहीत कारण त्यांच्या त्यांना नोकरीच मिळाली नाही मग देश पुढे कसे जाणार मोदी सरकार पूर्णपणे देशाची दिशाभूल करत आहेत आता आगीतून फुफाट्यात अग्निपथ योजना आणली मी अनेक राज्यात फिरले बिहार, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व इतर राज्यातील तरुण भरतीसाठी अनेक वर्षे रोज अहोरात्र मेहनत करत असतात या सगळ्या युवकांना युवकांना जीव ऐरणीवर आला आहे त्यांना आत्महत्या करण्याची पाळी आली आहे त्यांना वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार करत आहे. याचा विरोध आपण सगळेजण मिळून करुया जोपर्यंत ही अग्निपथ योजना मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.


या धरणे आंदोलनात माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, मा. जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, मा. सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस अलकांताई राठोड, किसन मेकाले, अँड. मनीष गडदे मा. नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, मा. नगरसेविका अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, फ्रंटल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मा नगरसेवक जेम्स जंगम, मधुकर आठवले, सिद्राम अट्टेलुर, विनोद गायकवाड, कमरूनिस्सा बागवान, अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, नागनाथ कदम, केशव इंगळे, शकील मौलवी, हाजीमलंग नदाफ, रामसिंग आंबेवाले, NK क्षीरसागर, राजन कामत, डॉ आप्पासाहेब बगले, अनिल मस्के, रॉकी बंगाळे, शोकत पठाण, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, राहुल वर्धा, प्रवीण जाधव, पवन गायकवाड, सुशील बंदपट्टे, अंकुश गायकवाड, सुमन जाधव, विवेक कन्ना, अमोल भोसले, प्रमिला तुपलवंडे, नामदेव फुलारी, नूर अहमद नालवार, रवी आंबेवाले, लतीफ शेख, रुस्तुम कंपली, संजय मैनावले, अनिल जाधव, संजय गायकवाड, अनंत म्हेत्रे, मल्लिनाथ सोलापुरे, सायमन गट्टू, इरफान शेख, विषमय भोसले, श्रीकांत वाडेकर, सुभाष वाघमारे, चंद्रकांत टिक्के, श्रीकांत दासरी, दीनानाथ शेळके, जिशान सय्यद, सुनील सारंगी, बालाजी जाधव, दाऊद नदाफ, शिवाजी साळुंखे, लता गुंडला, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळी, वशिष्ट सोनकांबळे,  शिवानंद अजनाळकर, चक्रपाणी गज्जम, धीरज खंदारे, VD गायकवाड, राजेंद्र शिरकुल, जगदेवी कदम, अंजली मंगोडेकर, श्रुतिका तुप्पद, नीता बनसोडे,  प्रशांत कांबळे, राजेश झंपले, अभिषेक थोरात, महेश काळे, संदीप क्षीरसागर, सचिन कांबळे, दिनेश म्हेत्रे, पॉल जगले, गोपाळ नंदूरकर, अशोक सायबोलु, एजाज बागवान, शाहू सलगर, चंदा काळे, बसंती साळुंखे, सुनीता बेरा, सिद्राम काडादी, विवेक इंगळे, अनिल वाघमारे, अजित गुजले, अजय व्हटकर, लखन गायकवाड, अशोक म्हेत्रे, रवी कल्याणकर, ज्ञानेश्वर जाधव, भागीरथी उपार, माणिक यादव, यांच्यासह सैन्य भेटीसाठी इच्छुक अनेक तरुण व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads