मौजे कासेगावात येथे राजकीय हक्क परिषद संपन्न
पंढरपूर - बहुजन समता पार्टी च्या वतीने मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे रेणुका मंदिर हॉल मध्ये राजकीय गुलामगिरीच्या विरोधात राजकीय हक्क परिषद संपन्न झाली असल्याची माहिती बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी दिली. बहुजन समता पार्टी व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका पुष्पलता सकटे यांनी मार्गदर्शन केले दलित समाजात विशेषता मातंग समाजातील लोकांच्या मनात असलेली राजकीय गुलामगिरीचे दोरखंड तोडून छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक वीर फकीरा आदी महापुरुषांच्या विचारांच्या शिदोरीच्या जोरावर स्थानिक राजकीय गुंडगिरी दहशत आणि गुलामगिरी संपवण्यासाठी या राजकीय हक्क परिषदेचे आयोजन केल्याचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर यांनी सांगितले .
दलित बहुजन समाजातील विशेषता मातंग समाजातील लोकांना स्वतःच्या बहुमोल मताची जाणीव करून देऊन राजकारणाच्या सारीपटावर आपणही किंग मेकर किंवा किंग होऊ शकतो असे पुष्पलता सकटे यादी मार्गदर्शन करताना सांगितले यांनी मनोगतामध्ये सांगितले परिषदेसाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील आवघडे, जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक रमेश कांबळे, किशोर जाधव, बहुजन समता पार्टी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम रणदिवे, बहुजन समाज पार्टी जिल्हा सरचिटणीस दगडू यादव, युवा आघाडीचे मारुती नाईकनवरे, माजी सभापती संजय नाईकनवरे, पंढरपूर तालुका दलित महासंघ अध्यक्ष अमोल खिलारे, युवा आघाडी उपाध्यक्ष शरद सर्वगोड, प्रगतशील बागायतदार हनुमंत ताटे, सोमनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या राजकीय हक्क परिषदेसाठी बहुसंख्येने महिला पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग खिलारे ,बंडू रणदिवे, चंद्रकांत जाधव, सत्यवान फाळके, सज्जन जाधव, गणेश बंडगर, तानाजी खिलारे, भिकाजी वाघमारे, अक्षय कुचेकर, प्रभाकर खिलारे नितीन खिलारे सुनील खिलारे यांनी केले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा