निरगुडी ग्रामपंचायतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास पंधरा टक्के निधीतून पुस्तके देऊन महाराष्ट्रापुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे - वैभव गीते
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय समितीच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वैभव गिते सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय समिती व निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने पुस्तके अनावरण,संविधान चौक नामफलक उद्घाटन आणि सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन केल्याबद्दल वैभवजी गीते,अॅड. अमोल सोनवणे (विशेष सरकारी वकील) अॅड.बापूसाहेब शिलवंत यांचा नागरी सत्कार सोहळा निरगुडी ता.फलटण येथे आयोजित केला होता.
प्रथम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमात वैभव गीते साहेबांनी शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या तरच गोरगरिबांचा विकास होऊ शकतो.ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात मिनी ट्रॅक्टर ची योजना राबवली आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्यातही बचतगटांना ट्रॅक्टर ची योजना राबवण्याचा निश्चय केला. निरगुडीचे सरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांचे कौतुक केले तसेच या ग्रामपंचायतीने पंधरा टक्के निधीतून समाजउपयोगी पुस्तके देऊन महाराष्ट्रापुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे आणि याचे अनुकरण प्रत्येक ग्रामपंचायतीने केले पाहिजे. याबरोबरच अॅड.अमोलजी सोनवणे साहेब यांनी समाजप्रबोधन करून आयोजकांचे तोंडभरून कौतुक करून महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहलेल्या गीतांच्या ओळी सांगितल्या आणि एन.डी.एम.जे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार अॅड.बापुसाहेब शिलवंल यांनी महापुरुषांचे विचार प्रत्येक नागरिकांनी अंमलात आणणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
गावचे सरपंच राजेंद्र सस्ते यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.तसेच गावाच्या विकासासाठी आणि ग्रंथालयासाठी पंधरा टक्के निधीच नाही तर लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करु असेही सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर जाधव, प्रास्ताविक प्रशांत सोनवणे यांनी केले तर आभार युवराज सोनवणे यांनी मानले.
यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे, केंद्रीय पत्रकार संघाचे फलटण तालुका सदस्य निलकुमार गोरे, केंद्रीय पत्रकार संघाचे फलटण तालुका सदस्य धनंजय लकडे, ग्रामसेवक कदम आण्णा, ग्रा.पं.सदस्य अमोल सस्ते, सचिन सस्ते, महावीर बनसोडे, पिंटू सोनवणे, किशोर सोनवणे, महादेव गोरे विपुल सोनवणे, युवराज सोनवणे, अभिषेक सोनवणे, प्रतिक सोनवणे, बाळासाहेब सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा