छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रमाई नगर तारापूर येथे उत्साहात साजरी.. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रमाई नगर तारापूर येथे उत्साहात साजरी..

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रमाई नगर तारापूर येथे उत्साहात साजरी..


पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कै.पैलवान संभाजी वाघमारे यांची कन्या कुमारी पुर्वा वाघमारे आणि शरयू वाघमारे यांनी "माझ्या राजाचं नाव गाजतय" हे गाणं म्हटले. 


या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन भिमाई महिला स्वयं सहायता बचत गट यांनी केले होते.


नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेच्या तालुका सचिवपदी बळीराम वाघमारे यांची निवड झाली आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांचा सत्कार केला.


या कार्यक्रमास सरपंच पोपट कोळी, उपसरपंच समाधान जगताप, लाकत मुलाणी, तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर शेळके, माजी सरपंच सिद्राम वाघमोडे, वैभव डोळे ,प्रदीप कदम, फिरोज मुलाणी, सुनील चौधरी, विक्रम शेळके, पिंटू माने सर, मच्छिंद्र सपाटे ,रामभाऊ गायकवाड, अतिश गायकवाड, अभिषेक गायकवाड, उमेश वाघमारे, समाधान गाडे, सुभाष गायकवाड ,महिला बचत गटाच्या प्रमुख सुजाता वाघमारे ,अंगणवाडी सेविका सरस्वती वाघमारे, अंगणवाडी सेविका स्वाती म्हमाणे, अंगणवाडी मदतनीस प्रमिला गाडे, भिमाई महिला बचत गटाचे अध्यक्ष कोमल वाघमारे, मनीषा वाघमारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads