समाजकल्याण विभागातील शासकीय योजना व महामंडळाच्या कर्ज योजना शिबीरास प्रचंड प्रतिसाद आमदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम
सोलापूर - दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून समाजकल्याण विभाग महामंडळाच्या विविध योजना व लोन शिबीराचे आयोजन सतनाम चौक, कबड्डी मैदान, लष्कर, सोलापूर येथे सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत करण्यात आले होते. याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटनेता चेतन नरोटे, देवेंद्र भंडारे, मनोज यलगुलवार, हणमंतू सायबोळू, करेप्पा जंगम, लखन गायकवाड, सुरेश पाटोळे, तिरुपती परकीपंडला, मारुती माळगे, शुभांगी लिंगराज, डॉ. एस.के. गायकवाड, राहूल अडसंगे व सर्व महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबीरामध्ये 1) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, 2) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, 3) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, 4) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, 5) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, 6) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, 7) बार्टी अंतर्गत येणारे विविध योजना या समाजकल्याण विभागाच्या विविध योजना व लोन यांचा समावेश होता. लाभार्थ्याना विविध योजनांचा लाभ एका छताखाली व त्याकरीता लागणारे आवश्यक ते कागदपत्रांची तपासणी करून लवकरात लवकर लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी याचे आयोजन केले होते.
सदर शिबीराचा 350 नागरीकांनी याचा लाभ घेतला असून आपले संबंधित कागदपत्रे जमा केलेली आहेत. नागरीकांना विविध योजनांचा लाभ एका छताखाली आमदार प्रणिती शिंदे यांनी मिळवून दिल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व नागरीकांनी त्यांचे आभार मानले. तसेच यापुढेही सोलापूर शहरातील विविध प्रभागामध्ये अशा पध्दतीने शिबीराचे आयोजन करण्यात येतील असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी रवी आंबेवाले, परशुराम सत्तारवाले, दाऊद नदाफ, कांबळे, अत्ताउल्ला पटेल, श्रीनिवास लिंगराज, अशोक आयगोळे, राजू कोरे आदि. बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
BetMGM Hotel Casino & Spa - Mapyro
उत्तर द्याहटवाThe BetMGM 성남 출장마사지 Hotel Casino & 충청남도 출장안마 Spa is 여주 출장샵 a 1-minute drive from the Casino and is within 당진 출장안마 a 10-minute walk of Borgata Hotel Casino & 이천 출장안마 Spa and Borgata