मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन
पुणे - कोरेगाव भीमा येथे ऐतिहासिक जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. ऐतिहासिक लढाईत लढलेल्या व शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील वीरांना वंदन करण्यासाठी, जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींनी कोरोना प्रतिबंधक नियम तसंच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावं, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, असं आवाहन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा