शौर्यदिन कार्यक्रमात १० लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा.
शासनाच्या नियमांचे पालन करुन शौर्यदिन उत्सवात साजरा होणार
काही नियमांमधे शिथीलता मिळावी म्हणुन राज्य सरकारकडे दाद मागणार.
पुणे- भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनता शौर्य दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे, तसेच संपूर्ण भारतातून जवळपास दहा लाख आंबेडकरी जनता या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यची शक्यता आहे. शौर्यदिनाच्या पार्शभुमिवर गृहविभागाने काढलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या शासन निर्णयाच्या अधिन राहुन शौर्यदिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. गृहविभागाने काढलेल्या शासननिर्णयातील काही अटींवर शिथिलता आणावा या साठी राज्यसरकारकडे दाद मागण्यात येणार असल्याची माहीती राहुल डंबाळे यांनी दिली.
दरम्यान गृहविभागाने काढलेला शासन निर्णय सदोष व घाईगडबडीत काढलेला असुन हा उत्सव सामाजिक न्याय विभागाकडुन साजरा होत असताना त्यांना या निर्णयाबाबत विचारात घेतलेले दिसुन येत नसल्याने शासनाच्या विभागंमधेच ताळमेळ नसल्याचे या निमित्ताने वास्तव पुढे येत आहे.
शासनाचा निर्णय काही असला तरी आंबेडकरी जनता शौर्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याविषयीच्या सुचना यापुर्वीच सर्वांना दिलेल्या आहेत. त्याचे पालन करुन उत्सव केला जाईल. अशी माहीती भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा