शौर्य स्मारक भिमाकोरेगाव विजयस्तंभाचा प्रस्तावित आराखडा सरकारला सादर
पुणे - भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून यामुळे आंबेडकरी जनतेत अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. प्रस्तावित स्मारकाविषयीचा आराखडा या स्मारकासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने राहुल डंबाळे यांनी आज राज्य सरकारकडे सादर केला आहे.
नियोजित स्मारक हे सर्व घटकांसाठी प्रेरणादायक पर्यटन स्थळ व्हावे, तसेच आंबेडकरी समुदायाच्या सर्व भावनांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी या स्मारकात 1927 आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी दिलेल्या प्रसंगात शौर्य गाजवणाऱ्या शूरवीर महार योद्ध्यांचे व इतर सैनिकांचे स्मृतीशिल्प करण्यात यावे. तसेच स्मारका लगतच्या नदीकिनारी गंगा घाट च्या धर्तीवर सुंदर घाट विकसित करण्यात यावेत यासह इतर बाबींचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सदर स्मारकाचा आराखडा M/S ICONICX चे वास्तुविशारद श्री सतिष कांबळे यांनी तयार केला आहे व यासाठी नगरसेवक राहुल भंडारे यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच समाज कल्याण आयुक्त सादर करण्यात आलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा