मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन बहिणींचा मृत्यू आ. समाधान आवताडे यांची सांत्वनपर भेट - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन बहिणींचा मृत्यू आ. समाधान आवताडे यांची सांत्वनपर भेट

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन बहिणींचा मृत्यू आ. समाधान आवताडे यांची सांत्वनपर भेट 


सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण कुटुंबीयांची सांत्वनपर आमदार समाधान आवताडे यांनी भेट घेतली आहे . चव्हाण परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत असे आ. समाधान आवताडे म्हणाले.

चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी मी पूर्ण ताकदीनीशी त्यांच्या पाठीशी असेन असे आश्वासन उपस्थितांना दिले. 

याप्रसंगी जि.प उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी शुगर संचालक सचिन शिवशरण,राजन भैय्या पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads