भीमाकोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रम तयारी अंतिम टप्प्यात भारतीय सैन्यदलाकडून मानवंदनासाठी प्रशासनाचे प्रयत्न - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

भीमाकोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रम तयारी अंतिम टप्प्यात भारतीय सैन्यदलाकडून मानवंदनासाठी प्रशासनाचे प्रयत्न

भीमाकोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रम तयारी अंतिम टप्प्यात भारतीय सैन्यदलाकडून मानवंदनासाठी प्रशासनाचे प्रयत्न 


पुणे : भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाची तयारी पूर्ण शासनाकडून उत्सव होणार असल्याने आनंदाचे वातावरण भारतीय सैन्यदलाकडून मानवंदनेसाठी शासनाकडून प्रयत्न चालू असल्याची माहिती भिमा कोरेगाव विजयास्तंभ  शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


                  भिमाकोरेगाव लढयातील शूरवीर महार यौध्यांना अभिवादन करण्यासाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ येथे ०१ जाने २०२२ रोजी होणान्या शौर्यदिन कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यंदाचा उत्सव हा राज्य सरकारचे वतीने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व त्याचे भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन प्रशासकीय समितीच्या मार्फत करण्यात येणार असल्याने आंबेडकरी समुदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच भारतीय सैन्यदलाच्या महार रेजिमेन्टमार्फत याठिकाणी मानबदनेचा कार्यक्रम व्हावा याबाबतचा शासकीय पत्रव्यवहारही सुरू करण्यात आहे. कीविड-१९ ओमीक्रांन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय पक्ष संघटनांना परवानगी नाकारण्यात आली असली तरी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आबेडकरी अनुयायाच्या संख्येवर निर्बंध नाहीत, असे प्रशासनाच्या झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.


यदाचे वर्षे निजयस्तंभ उभारणीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने अगोदरच नागरिकांमध्ये उत्साह होता त्यात सरकारने सदर स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याबाबतचा निर्णय घेवून त्यासाठी समाज कल्याण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सुमारे १०० कोटी रूपये विजयस्तंभ स्मारकासाठी खर्च करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आंबेडकरी अनुयायाचा आनंद द्विगुणीत झालेला आहे व त्याचे सकारात्मक परिणाम. यावर्षीच्या उत्सवात जाणवतील.


पिण्याचे पाणी, शौचालय, कायमस्वरूपी लाईट व्यवस्था, सुमारे १६० एकर पेक्षा अधिकची पार्किंग व्यवस्था, १०० पेक्षा अधिक बसेस यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आबेडकरी अनुयायांना उपलब्ध करून देणेसाठी प्रशासनाने कसोशिने प्रयत्न केले असून संपूर्ण नियोजन करताना आंबेडकर समुदायातील विविध पक्ष व संघटना याचे प्रतिनिधीशी वेळोवेळी विचारविनिमय व बैठका घेवून करण्यात आली आहे.


यंदाच्या वर्षी उत्सवावर कायदा सुव्यवस्थेविषयी कोणताही तणाव नसुन केवळ ओमिक्रींना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर याठिकाणी सभा संमेलने घेण्यास प्रतिबंध करण्यात येणार असून आंबेडकरी समुदायाकडून या ठिकाणी अनेक वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या अभिवादनपर इतर सर्वच कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय समिती व कार्यकत्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असल्याचेही सुनिश्चित करण्यात आलेले आहे. यदा विजयस्तंभाला फुलांची सजावट, लाईटींग ची आरास, स्पिकर व स्वागतपर मंडप इत्यादीची व्यवस्था प्रशासनाकडूनच करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे.


या संपूर्ण उत्सवासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालय, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे जिल्हा परिषद, बार्टी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग व भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती तसेच इतर स्थानिक समित्या, आयोजक पक्ष, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत चांगल्या वातारणात पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.


उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे अनिर्वाय असून जिल्हा परिषदेकडून सदर ठिकाणी लाखो मास्कचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.


तरी सदर उत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. तसेच राजकीय सभां विषयी अद्याप प्रयत्न सुरू असून त्याबाबत राज्य सरकारचे प्राप्त सुचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येणार असला तरी याठिकाणी आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल लावणेस मात्र प्रशासनाने सहमती दर्शविली असून त्यांचेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने यंदाच्या वर्षी दिक्षाभूमी चैत्यभूमीप्रमाणे विक्रमी पुस्तक व आंबेडकरी साहित्य विक्री होईल असा विश्वास आम्हास वाटतो.

1 टिप्पणी:

  1. videogames-games-index.com Archives: YouTube News
    Videogames.com youtube mp3 (video game) was one of the first companies to launch the "live dealer" platform, which lets you buy games on the go.

    उत्तर द्याहटवा

Adsense ads