पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून तब्बल 58 हजार मतांनी विजयी.. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून तब्बल 58 हजार मतांनी विजयी..

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून तब्बल 58 हजार मतांनी विजयी..

West Bengal Chief Minister Mamata Banerjee won the Bhavanipur constituency by a margin of 58,000 votes

पश्चिम बंगाल - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेस  पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेच्या निवडणुकीत नंदिग्राम या मतदारसंघातून पराभुत व्हावे लागले होते. त्यांना नंदिग्राम या मतदारसंघात त्यांचे जुने सहकारी शुभेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव  स्वीकारावा लागला होता. 

शुभेंदु अधिकारी हे भाजपकडून या मतदारसंघातून उभे राहिले होते.


पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाला घवघवीत यश संपादन झाले होते परंतु त्यांना पराभव नंदिग्राम या मतदारसंघातून स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यात विधानसभा सदस्य असणे आवश्यक असल्याने त्यांनी त्यांचा जुना मतदार संघ भवानीपुर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांनी तब्बल 58 हजार मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केलेला आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास उभे होते.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती त्याच वेळेस तृणमुल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर विजयाचा जल्लोष साजरा करायला सुरुवात केली होती.

या मतमोजणीत एकूण 21 फेऱ्या होत्या.

या भवानीपुर मतदारसंघात एकूण 57 टक्के मतदान झालं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads