देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढणार - रेखाताई ठाकूर - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढणार - रेखाताई ठाकूर

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढणार -  रेखाताई ठाकूर

Deglaur Biloli Assembly by-election Vanchit Bahujan Alliance to fight with full force - Rekhatai Thakur

नांदेड - देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवुन मोठ्या ताकदीने लढणार आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले आहे.


देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून वंचित बहुजन आघाडी सुरूवातीपासून या मतदारसंघात ही निवडणूक लढविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. 


याच अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला  यावेळी त्या म्हणाल्या राज्यात झालेल्या गत लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला एक पर्यायी पक्ष म्हणून समोर आला आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ने संपूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद दाखविली आहे. विशेषतः देगलूर बिलोली मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली असून 100 च्या वर ग्रामपंचायत सदस्य या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहेत.


 निवडणुकीसाठी असलेली एकूणच तयारी व पक्षबांधणी या मतदारसंघात चांगल्याप्रकारे झालेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक जिंकण्यासाठी लढणार आहे. असेही त्या म्हणाल्या.


या मतदारसंघासाठी शासनाकडून अमाप निधी येऊनही प्रस्थापित सत्ताधारी यांना या मतदारसंघाचा विकास साधता आला नाही. किंबहुना तो त्यांनी जाणीवपूर्वक केला नाही. ज्याप्रमाणे हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. त्याचप्रकारे मागास घटकांना न्यायिक वागणूक देण्यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. हे या भागात घडलेल्या अनेक घटना वरून समोर येते.


निवडणुकीच्या तोंडावर निधी वाटपाचे सोंग करणारे, विकास मात्र करणार नाहीत हे वास्तव आता या मतदार संघातील जनता चांगलीच ओळखून आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वच प्रस्थापित पक्षांची एकमेकांसोबत मिलीभगत असल्यामुळे खंबीर विरोधी पक्ष म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडीच लढत असल्याची जाणीव मतदारांना झाली आहे.


 दरम्यानच्या काळात सर्व समाज घटक मोठ्या ताकदीने वंचित बहुजन आघाडीत सहभागी होत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे याच उत्साहाच्या व मतदारांच्या विश्वासाच्या बळावर देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये विजय निश्चित होईल याची आम्हाला खात्री आहे असा आशावाद यावेळी रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केला. लवकरच वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवार घोषित करेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, विभागीय सदस्य डॉ. संघरत्न कुरे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजिनिअर प्रशांत इंगोले, वंचितचे नेते नामदेवराव आयलवाड, महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ,  महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड आयुब खान पठाण, महासचिव श्याम कांबळे, साहेबराव बेळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads