मोठी बातमी..... सोलापूर जिल्ह्यात प्रशासना कडून होणार वाळूचा लिलाव - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

मोठी बातमी..... सोलापूर जिल्ह्यात प्रशासना कडून होणार वाळूचा लिलाव

मोठी बातमी..... सोलापूर जिल्ह्यात प्रशासना कडून होणार वाळूचा लिलाव

Big news ..... Sand auction will be held by the administration in Solapur district


सोलापूर - सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेली भीमा नदी वाळू उपशामुळे कलंकित झाली आहे.

भीमा नदीच्या आवारातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील नद्यांच्या आवारातील वाळू चोरीला गेले होती ती शासनाने जप्त केली होती.

सोलापुरातील पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांनी अंदाजे सोळा हजाराहून अधिक ब्रास वाळू जप्त केली आहे.

या एकूण वाळूची किंमत अंदाजे 65 लाख आहे.


ही जप्त वाळूमध्ये माती मिसळून खराब होत आहे. 

पावसाच्या पाण्याने वाहून जात आहे.  त्यामुळे वाळू खराब होऊन वाया घालवण्यापेक्षा ही वाळू गरजूना देण्यात येणार आहे. 

लोकांना घरकुल बांधण्यासाठी वाळू मिळत नाही.

त्यामुळे बांधकामासाठी लोकं नदी पात्रातून वाळूची चोरी करतात हे सर्व प्रकार घडू नये म्हणून ही जप्त केलेली वाळू आहे तिचा लिलाव प्रशासन करणार आहे.


या वाळूचा लिलाव मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सामील होऊन लिलावामध्ये भाग घ्यावा असे जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.


शासनाचे नुकसान होऊ नये व शासनास त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळावा म्हणून जप्त केलेल्या वाळूची महसूल विभागाने लिलाव प्रक्रीया सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads