औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे बेरोजगार मेळावा... - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे बेरोजगार मेळावा...

औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे बेरोजगार मेळावा..

Unemployment rally by Vanchit Bahujan Aghadi in Aurangabad

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी तर्फे बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे मुख्य  मार्गदर्शक व प्रमुख अतिथी  मा. सुजात आंबेडकर  (युथ आयकॉन) आणि प्रमुख उपस्थिती मा. अमितभाऊ भुईगळ ( नेते महाराष्ट्र राज्य) यांची आहे.


आज महाराष्ट्रातील असंख्य कामगार, शिक्षित  विद्यार्थी, तरूण-तरूणी बेरोजगार झालेले  असून ,महाराष्ट्रातील कामगार , तरूण हा आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला  आहे.

प्रस्थापित सरकारने आपल्याला आजवर फक्त अच्छे दिन  चे गाजर दाखविले असून डिजिटल इंडिया चे खोटे आश्वासन दिले आहे. पण प्रत्यक्ष रित्या त्यांनी साधारण , होतकरु तरूण वर्गाला , कामगारांना मतांचा वापर करून मरण्यासाठी सोडलय.पण या सर्व परिस्थितीची दखल घेत या प्रस्थापितांच्या खोट्या आश्वासनांवर हल्लाबोल करण्यासाठी  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेरोजगार मेळावा चे आयोजन केले आहे.


औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक नगरीत बेरोजगार मेळाव्यात मार्गदर्शक व प्रमुख अतिथी म्हणून थेट लंडनहून  तरूणांचे आयकॉन मा . सुजात आंबेडकर साहेब  औरंगाबाद नगरीत दिनांक  3-10-2021 रोजी सकाळी  11.00 वाजता सप्तपदी मंगल कार्यालय एन-7 सिडको येते सदरील मेळाव्यासाठी औरंगाबाद शहरात येत आहेत.

तरी  सर्व तरुण बेरोजगार युवकांनी  या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. 

कारण पढलिखकर भी युवा बेकार बैठे है,

डिग्रीयों लेनेवालें भी देखो लाचार बैठे है...|

जिन्होंने रोजगार देने का वादा किया था,

वो खुर्सीपर मुस्कुराये बैठे है...|


ही परिस्थिती बदलण्यासाठी  सर्वांनी एकत्र येऊन हा बेरोजगारीचा लढा यशस्वी करून दाखवायचा आहे.

आपल्या हक्काचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची ही नम्र विनंती करण्यात आली आहे .


निमंत्रक:- वंचित बहुजन आघाडीचे  सर्व आयोजक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

कोमल . एस. हिवाळे

महीला आघाडी शहर प्रसिद्धी प्रमुख औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads