साकोली विधानसभा क्षेत्रात विविध पुलांच्या बांधकामांसाठी 15 कोटी रुपये मंजूर.
Rs 15 crore sanctioned for construction of various bridges in Sakoli assembly constituency.
भंडारा - साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या विशेष प्रयत्नाने स्थानिक मतदारसंघात विविध पुलांचे बांधकाम मंजूर झाले असून एकूण बांधकामाची रक्कम जवळपास 15 कोटी रुपये एवढी आहे.
साकोली तालुक्यात पापड़ा (खुर्द) ते नयनगाव रोड दरम्यान पुलासाठी एक कोटी दहा लाख, लाखनी तालुक्यातील मांगली ते मचारना - निमगाव - कानळगाव मुरमाडी पुलासाठी चार कोटी, साकोली तालुक्यात गोंड-उमरी पवारटोली रस्त्यावर पुलासाठी दीड कोटी, लाखनी तालुक्यात रेंगेपार गोंडसावरी परसोडी खुर्सीपार पळसपाणी पासून राज्य महामार्ग 356 येथे पुलाचे बांधकामासाठी दीड कोटी, साकोली तालुक्यात महालगाव ते परसोडी सुंदरी सौंदड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम यासाठी सव्वा कोटी, साकोली तालुक्यात बोदरा ते जांभळी रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 40 लाख, लाखनी तालुक्यात सोनेगांव पेंढरी सोनेगांव मुरमाडी मचारना ईसापुर रोडवर पुलाचे बांधकामासाठी 1 कोटी 40 लाख, लाखांदुर तालुक्यात शिंदपूरी शिवनाळा मोहरना ईसापुर रोडवर पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 40 लाख, ओपारा मांढळ दांडेगाव दहेगाव रोडवर पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 40 लाख रु असा 15 कोटी एवढा निधी या विकासकामांसाठी उपलब्ध झाला आहे.
ही विकासकामे होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. नानाभाऊ पटोले सातत्याने प्रयत्नरत होते. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार देखील केला. आणि साकोली विधानसभा क्षेत्रात जवळपास 15 कोटी रूपयांचा निधी या विकास कामांसाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला. नाबार्ड मार्फ़त हे विकासकाम मंजूर झाले असुन मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांना जोडण्यासाठी सदर मंजूर झालेले पूल आणि रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे दुवा असतील. यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
मतदारसंघातील विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असून येणाऱ्या दिवसांमध्ये देखील मतदारसंघासाठी भरघोस निधी उपलब्ध होईल, यापूर्वी देखील साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात विविध विकास कामे मंजूर झाली असून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. येणाऱ्या काळात देखील विकासाची गंगा आपल्या मतदारसंघात राहील अशी ग्वाही मा. नानाभाऊ पटोले यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा