सोलापूरच्या एस पी तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या नावाने फेसबुकवर 'फेक आयडी' त्याच्यावरून 'पैशाची मागणी' - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

सोलापूरच्या एस पी तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या नावाने फेसबुकवर 'फेक आयडी' त्याच्यावरून 'पैशाची मागणी'

सोलापूरच्या एस पी तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या नावाने फेसबुकवर 'फेक आयडी' त्याच्यावरून 'पैशाची मागणी'

Fake ID on Facebook in the name of SP Tejaswini Satpute Madam of Solapur demands money from him


सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या एस पी तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट काढून त्याच्यावरून पैसे मागणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


तेजस्विनी सातपुते मॅडम यांना समजताच त्यांनी फेसबुक वरूनपोष्ट लिहून असे सांगितले आहे की, 

"माझ्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट आहे.

 त्याच्यावरून पैशाची मागणी होत आहे.

 मी त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे.

 तरी त्या अकाउंटला अनफ्रेंड करा."


सोशल मीडियाचा सर्रास गैरवापर होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा वापर करून सामाजिक तेढ निर्माण करणे, पैशाची मागणी करणे आणि हनी ट्रॅप चालवणे अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत.

सोशल मीडिया वापरताना आपण त्याची संबंधित काळजी घेतली पाहिजे.गौरवपर होऊन आपला तोटा होऊ नये यासाठी ओळखीच्या माणसांच्याच संबंधात राहिले पाहिजे.  ओळखीचे नाहीत त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायचं नाही.

नाहीतर पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही हे मात्र नक्की आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads