‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल चोवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल चोवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड

‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल चोवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड

Twenty-four students from the engineering college run by the Vitthal Education and Research Institute were selected through campus interviews in an interview conducted by a company named ‘Q Spider’.

पंढरपूर - ‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल चोवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       आय.टी. क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील ‘क्यू स्पायडर’ या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विशाखा भास्कर कांबळे, वैष्णवी भगवान भादुले, अबोली विजय गायकवाड, प्राची प्रसाद गुरव, सायली दत्तात्रय आवताडे, सायली तानाजी मगर, तस्लीम रफिक खतीब, मल्हार पांडुरंग उराडे व रिचा दिनेश ताम्हाणे हे नऊ विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रतिक्षा हनुमंत वागज, जान्हवी दिलीप शेंबडे, स्वप्नील प्रकाश दर्शनाळे, अभिषेक विलास देशमुख, ऐश्वर्या संजय म्हमाणे,श्रद्धा भारत मिरगणे,अभिलाषा अविनाश काळे, अमित गणपतराव दणुरे व वैष्णवी जयसिंग मोरे हे नऊ विद्यार्थी आणि मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील पवन शशिकांत परकम, प्रनील प्रकाश नागरस, गौरी रामचंद्र गोरे, शुभम दत्तात्रय बनसोडे, रोहित चंद्रकांत आदलिंगे व अक्षय अंगद टकले हे सहा विद्यार्थी, असे मिळून ‘क्यू स्पायडर’ कंपनीत स्वेरीच्या एकूण २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला नेमके कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व संबंधित प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या २४ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads