सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे - शरद पवार - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे - शरद पवार

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे - शरद पवार 

While the Solapur Municipal Corporation election has not been honored, the NCP is ready to contest on its own - Sharad Pawar


सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना असे म्हटले आहे की,

  " आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा आज झाली. यापुर्वीच्या निवडणुकीकडे आपण हवे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या हातात मनपा गेली आणि सोलापूर शहराचा विकास खुंटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करुन निवडणूक लढवली पाहीजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे. मनपात ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत, त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहीजे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्षवाढीसाठी जसे अनुभवी नेत्यांची गरज असते तसेच पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर तरुणांना पुढे केले पाहीजे. त्यामुळे या निवडणुकीत तरुणांना अधिक संधी द्या. त्यांना विसरु नका, हा माझा आग्रह राहील. 


एकेकाळी सोलापूर शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जायचे. सोलापूर शहरात मोठी कारखानदारी होती. मात्र आता सोलापूरला कारखाने दिसत नाहीत. सोलापूर मनपात राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात असा माझा आग्रह आहे, कारण मला सोलापूरचे जुने दिवस आणायचे आहेत. कारखाने पुन्हा सोलापूरमध्ये आले पाहीजेत. त्याचप्रकारे पुण्यातील हिंजवडीप्रमाणे सोलापुरात देखील आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी येथील स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत. त्याला देखील माझा पाठिंबा आहे. औद्योगिकीकरणावर आपल्याला लक्ष द्यायचे असेल तर मनपामार्फत योग्य धोरणे आखावी लागतील. सोलापूरचे पालकमंत्री स्वतः व्यवसायिक आहेत. त्यांना व्यवसायाचा चांगला अनुभव आहे. तसेच सोलापूरचा सामान्य माणूस कष्ट करायला कधीही नाही म्हणत नाही. त्याच्या कष्टाला सन्मान देण्याची गरज आहे. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्याच्या दृष्टीने सामुदायिक प्रयत्न केले पाहीजेत, असे माझे आवाहन आहे. "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads