लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मिनाज मुलाणी आणि नेहा गायकवाड या विद्यार्थिनींना इन्स्पायर अंतर्गत दर वर्षासाठी ८०,००० रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मिनाज मुलाणी आणि नेहा गायकवाड या विद्यार्थिनींना इन्स्पायर अंतर्गत दर वर्षासाठी ८०,००० रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मिनाज मुलाणी आणि नेहा गायकवाड या विद्यार्थिनींना इन्स्पायर अंतर्गत दर वर्षासाठी ८०,००० रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर.

Lotus English School and Junior College students Minaj Mulani and Neha Gaikwad sanctioned scholarships of Rs. 80,000 per year for 5 years under Inspire.


पंढरपूर-श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी मिनाज सय्यद मुलाणी व नेहा शाहु गायकवाड या विद्यार्थिनींना दर वर्षासाठी ८०,००० रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभाग कडून जे विद्यार्थी इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होतात त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. विज्ञान शाखेमध्ये देखील चांगले करियर करण्याची संधी मिळावी या हेतूने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे इन्स्पायर  (इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूएट फॉर इन्सापयर्ड रिसर्च– आय.एन.एस.पी.आय.आर.ई.) ही स्कॉलरशिप दिली जाते. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या वाटेवर वळून स्थानिक व जागतिक गरजांच्या दिशेने संशोधन केल्यास त्यातून चांगले शास्त्रज्ञ व संशोधक निर्माण होतील. हाच या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश आहे. ‘विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासून विज्ञानातील अभ्यासाची गोडी लावून संशोधन वृत्ती वाढीला लावण्याचा मुख्य उद्देश असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देशात निर्माण होईल.’ अशी माहिती ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी पुणे विभागीय बोर्डाकडून मिळालेल्या पत्राच्या माध्यमातून दिली. या विद्यार्थिनींना चांगले गुण मिळावे म्हणून विज्ञान विभागाचे प्रमुख डी.ए.वायदंडे, शिक्षक एस.बी.पवार, एस.टी.पवार, एस.आय. गाढवे, एस. आय. शिंदे आदी शिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच. एम.बागल, उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, विश्वस्त, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads