पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयवादी गावगुंडांना फाशी द्या - उत्तमदादा कांबळे (आरपीआय आठवले )
Hang the racist village goons of progressive Maharashtra - Uttamdada Kamble RPI AATHAVALE
कोल्हापूर - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील बोरगाव माळवाडी येथे जातीयवादी भावनेतून प्रेत स्मशानभूमीत नेण्यास मज्जाव करणाऱ्या गाव गुंडांवर व त्यांना मदत करणाऱ्या पोलिस प्रशासनावर ॲट्रॉसिटी दाखल करावी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भानामतीच्या संशयावरून दलित वृद्धांना मारहाण करणाऱ्या गावावर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व हातकणंगले तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे यांनी केले. जातीयवादी गावगुंडांचा धिक्कार असो, उठ दलिता हल्लाबोल, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
पंढरपूर येथील आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरगाव माळवाडी गावात 20 ऑगस्ट रोजी मातंग समाजात निधन झालेल्या व्यक्तीचे प्रेत स्मशानभूमीत नेण्यास काही गाव गुंडांनी विरोध केला व त्या प्रेताची विटंबना केली इतकच नाही. या अशा जातीयवादी घटनेची माहिती पोलिसांना दिली परंतु पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात हि वनी खुर्द गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील वयोवृद्ध महिला व पुरुषांना भरचौकात झाडाला व खांबाला बांधून जबर मारहाण केली. अशा या जातीयवाद्यांवर एट्रोसिटी दाखल झाले पाहिजे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सोनाली ता. कागल येथील कुमार वरद पाटील या सात वर्षीय बालकाचे अपहरण करून निर्घुण हत्या करणाऱ्या मारुती वैद्य याला व सावत्र मुलगी प्रणाली तिला नदीत ढकलणाऱ्या युवराज साळुंखे या नराधम बापास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने निदर्शने करण्यात आली मानवतेला काळीमा फासणाऱ्या बापा्ंना फाशीची शिक्षा द्या, तसेच समतेचा विचार मातीत गाडणाऱ्या जातीयवादी गावगुंडांवर एट्रोसिटी दाखल करा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी उत्तमदादा कांबळे म्हणाले महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो परंतु फुले ,शाहू, आंबेडकरांचे विचार मातीत घालणारी माणसं इथं जन्माला आली आहेत .त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे जर तो नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरून जातीयवाद्यांनी विरोधात आवाज उठवू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी मंगलराव माळगे, प्रा. शहाजी कांबळे, बाळासाहेब वशिकर, अविनाश शिंदे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, राहुल कांबळे, किरण निकाळजे, रूपाताई वायदंडे, नंदाताई भास्कर, प्रदीप मस्के, दिलीप कांबळे आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा