अभिनेत्री झरीन खानचा युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन द्वारे कोरोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

अभिनेत्री झरीन खानचा युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन द्वारे कोरोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान

कोरोना सारखे संकट येते तेंव्हा देशवासी जातीधर्मभेद विसरून एकजुटीने संकटाचा मुकाबला करतात - राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन द्वारे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान

Corona warriors honored by the United Buddhist and Ambedkarite Foundation Presenting Public Service Pride Award in the presence of Governor Bhagat Singh Koshyari, Union Minister Ramdas Athavale


मुंबई - भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. अत: दीप भव चा संदेश दिला. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असल्याने भारताने सर्वधर्मियांचे येथे स्वागत केले. भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन लोक कल्याणासाठी व्यतीत केले. भगवान बुद्ध व डॉ आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर करोना सारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईल, आपले जात धर्म विसरून सर्व भारतीय देशात आलेल्या संकटाचा एकदिलाने मुकाबला करतात त्यामुळे कोरोना चा ही सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला आहे असे प्रतिपादन राज्यपाल महामहिम  भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 


युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे कोरोनायोद्धा लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना.रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.      


इथे आले आहेत कोरोना योद्धा ;

मी वंदन करतो भगवान गौतम बुद्धा; 

माझी आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा ;

कारण मी आहे दलित मूव्हमेंट चा योद्धा ; 

अशी काव्यमय सुरुवात करून केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी  ये  है 2021 साल और  भगत सिंह कोश्यारी है लाडले  राज्यपाल ! अशी कविता सादर करीत ना रामदास आठवले यांनी आज  देशात सर्वाधिक मजबूत राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक केले. महामारी कधी संपूर्णपणे जाईल हे सांगणे कठीण आहे . मात्र नुकतीच बिहार राज्यात एकही कोरोना ची केस नसल्याची बातमी वाचण्यात आली. त्यामुळे कोरोना ला हद्दपार करण्याची आशा पल्लवित झाली आहे.असे सांगून करोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय ठेवून कार्य केले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी काढले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून करोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

 

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाड, रिपाइं चे अंकुश गायकवाड; उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले, इंग्लंड येथील हरबन्स विर्डी, अभिनेत्री डॉ झरीन खान, श्रुती पाटील; शिलाताई अनिल गांगुर्डे; हेमंत रणपिसे ;प्रा.कविता  संतोष शिकतोडे; वंदना राजेश मेहता; डॉ राम वाधवा ; वंदना सोनवणे; संजय मोरे; यांचेसह ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप जगताप संपादित दैनिक लोकधारा टाइम्सच्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिव्येश गणात्रा; प्रशांत मानकर; तुकाराम जाधव; विश्वनाथ सोनार; अजित सावंत; डॉ कारभारी खरात; राजेंद्र जाधव; अमित ओझा ; अनिलभाई गांगुर्डे; राजेश पुरस्वनी ;भूषण प्रदीप जगताप अरुण पाठारे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads