राज्यभर गाजलेल्या माचणूर ता.मंगळवेढा नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोकेचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू.. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

राज्यभर गाजलेल्या माचणूर ता.मंगळवेढा नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोकेचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू..

राज्यभर गाजलेल्या माचणूर ता.मंगळवेढा नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोकेचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू..

Nanasaheb Doke, accused in the state-wide Machnur taluka Mangalvedha manslaughter case, died in judicial custody.

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात माचणूर या गावात प्रतीक शिवशरण या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलाचे आक्टोंबर 2018 मध्ये अपहरण केले होते.

गुप्त धन प्राप्ति आणि कुटुंबातील लोकांच्या रोगमुक्तीसाठी या मुलाचा नरबळी देण्यात आला होता.

 यातील मुख्य आरोपी श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या संचालक नानासाहेब डोके हा होता.

गेल्या तीन वर्षापासून हा जेलमध्ये होता.

 जेलमध्ये असताना त्याला विविध रोगांनी ग्रासले होते, त्यासाठी त्याला पुणे येथे खाजगी रूग्णालयात  उपचारासाठी दाखल केले होते.

अखेर बुधवारी उपचार चालू असताना न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.

या आरोपीने चार वेळा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता पण चारही वेळा याचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला होता.

सरकारतर्फे अॅड. सारंग वांगीकर आणि मूळ फिर्यादी तर्फे अॅड.अनिकेत निकम यांनी काम पाहिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads