माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा. मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे - आमदार गोपीचंद पडळकर
Vadettivar should settle the claim of Rs 50 crore against me. I am not afraid of anything, because my mother and my father are Mr. Malhari Martand Khandoba and Arewadi's Biroba. - MLA Gopichand Padalkar
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना खालील प्रमाणे पत्र लिहिले होते
अतिमाननीय. विजय वडेट्टीवार,
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री,
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
मी मा.मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली, बरं आहे.
किंबहूना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते.
किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.
किंबहूना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता.
किंबहूना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती.
किंबहूना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती.
किंबहूना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल..
मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते.
त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी या पत्रास असे उत्तर दिले होते की , मी पाच वेळा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेलो आहे .माझं शिक्षण त्यांनी काढले पण त्यांना माहित नाही त्यांचे देशातले मंत्री किंवा आत्ताच कोकण मध्ये केंद्रीय मंत्री झालेले त्यांचे शिक्षण किती झाल आहे ? चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप केले आहेत, अरे नालायका 23 दुकानांमध्ये माझी पार्टनरशिप आहे म्हणतो. जर एका दुकानात जर पार्टनरशिप निघाली तर राजकारणातून संन्यास घेईन. हे आरोप सिद्ध नाही झाले तर तुझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करेन आणि चंद्रपूर गडचिरोलीला चकरा मारायला लावेन. 50 कोटीचा दावा मी या पडळकरावर टाकणार आहे. पडळकर एका बापाची अवलाद असेल तर आरोप सिद्ध करून दाखव.
याला आज गोपीचंद पडळकर यांनी उत्तर असे दिले आहे की, विजय वडेट्टीवार यांचा कतृव अहवाल जनतेच्या नजरेस पडल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडणे हे स्वाभाविक होतं. मांजर डोळे झाकून दुध पीतं तरी ते लोकांना दिसत असते. महाराष्ट्रातील ओबीसी ,विमुक्त जाती ,भटक्या जमाती यांच्या हक्काचे 125 कोटी रुपयांच्या 60-40 च्या टक्केवारी मध्ये खर्च करता आले नाही, आणि हे आता माझ्यावरती पन्नास कोटी चा दावा दाखल करण्यासाठी निघाले आहे.
माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा. मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा