इन्फोसिस वर केली जाणारी टीका हास्यास्पद आहे - खासदार सुप्रिया सुळे
Criticism of Infosys is ridiculous's - MP Supriya Sule
पुणे - पुणे येथील कोथरूड येथील गांधी भवन येथे "भारतीय संविधान आणि महात्मा गांधी" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी असे सांगितले आहे की, संविधानाप्रती सर्वसामान्य जनतेला आत्मियता वाटावी,त्याचा अभिमान वाटाला यासाठी आपण सर्वांनी काम करायला हवं. संविधान ही आपली ओळख आहे. संविधान व माझं नातं फक्त नागरिकशास्त्रातील २० मार्कांचा पेपर असं नाही.संविधानाच्या नुसार धोरणं ठरतात.त्यांचा तुमच्या-आमच्या जीवनावर प्रभाव पडतो.
आपण यावर आत्मचिंतन केलं पाहिजे. गांधी भवन सारख्या संस्था हे काम करतात,हे अतिशय महत्वाचं आहे.परदेशात देशाच्या दोन सुपुत्रांबाबत विचारलं जातं. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. मी परदेशात जाताना तेथे भेट देण्यासाठी या दोघांची पुस्तके घेऊन जाते.
सध्याचा काळ थोडा वेगळा आहे. आजकालच्या सत्ताधाऱ्यांना आपल्याला हवं तेच सांगेल असा असा इतिहास लिहायचाय. त्यामुळे महात्मा गांधी यांचा सत्य हाच इश्वर हा विचार मागे पडणार आहे. सत्यापासून दूर असणारा पुढचा समाज कसा असेल याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा.
पांचजन्य या मासिकातून इन्फोसिसवर टिका करण्यात आली आहे. पण इन्फोसिससारखी संस्था जी शून्यातून वर आलीय. जी देशात संपत्ती आणि नोकऱ्या निर्माण करीत आहे. कर आणि जीएसटी देखील भरते तिच्यावर विशिष्ट लेबल लावण्याचा प्रयत्न होत आहे.इन्फोसिसवर केली जाणारी टिका हास्यास्पद आहे.
यावेळी गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कानेकर,संदिप बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा