पुणे कोर्टासमोर बुधवारी धरणे आंदोलन....सर्व सामान्य पीडित दलित गरीब यांना न्याय देण्यासाठी वकिली करणारे एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांना पोलिसांनी कोर्टात जाण्याचा रस्ता आडवला.
पुणे - पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दलित नेते 26 वर्षापासून सर्व सामान्य पीडित दलित गरीब यांना न्याय देण्यासाठी वकिली करणारे एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांना पोलिसांनी कोर्टात जाण्याचा रस्ता आडवला. सर्वांसमोर अपमानित केले व कामकाजामध्ये भाग घेऊ दिला नाही ह्या एक बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा अथवा कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही .
त्यामुळे पुणे जिल्हा सत्र न्यायालय यांच्या मुख्य न्यायाधीशांकडे न्याय मागण्यासाठी व कोर्टातच न्याय मिळेल या भावनेने पुणे शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने संविधानिक मार्गाने बुधवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाच्या गेट बाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक अण्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला सदर बैठकीत आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंत दादा साळवे, नागेश भोसले, सिद्धांत सुर्वे,अशोक भिंगारे, रमेश कोल्हे, जयदीप सकट, आरती बाराते, रुबीना शेख, कालींदा सूर्यवंशी, राकेश सोनवणे, संतोष धुमाळ, बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब बनसोडे, विनोद चव्हाण, स्वप्निल वाघमारे, रीतेश गायकवाड, शुभम चव्हाण, सचिन वाघमारे, शशिकांत गायकवाड, इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते दलित वकिलांचा न्यायालयाच्या आवारात आवारात झालेला अपमान व झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्रात हजारो जनता आंदोलन करेल यासाठी पुण्यातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी प्रयत्न करावे त्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी संघटना सहभागी होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा